परभणी तरुण मृत्यू

परभणीत चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू

Parbhani Youth Death: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे डॉक्टर व्हिजिट करण्यासाठी आलेल्या तरुण वैद्यप्रतिनिधी नरेश भुवनेश्वर महादावाड यांना चक्कर पडून मृत्यू झाला. मृत्याचा कारण हृदयविकार असल्याचे आहे.

परभणीत चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू

Parbhani Youth Death

परभणी (Parbhani Youth Death) :  गंगाखेड येथे चक्कर येऊन पडल्याने तरुण वैद्यकीय प्रतिनिधीचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार १० जुलै रोजी दुपारी शहरात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम पाहणारा नरेश भुवनेश्वर महादावाड वय २६ वर्ष रा. पाळज ता. भोकर जि. नांदेड हा तरुण शुक्रवार १० जुलै रोजी गंगाखेड शहरातील डॉक्टरांना व्हिजिट करण्यासाठी आला असता दुपारी १ वाजेच्या सुमारास चक्कर आल्याने तो अचानक रस्त्यावर पडला तेथे जमलेल्या नागरिकांनी त्यास तातडीने शिसोदे हॉस्पिटल व नंतर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेंव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंडे, परिचारिका अश्विनी मुंडे, गोविंद वडजे यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

या (Parbhani Youth Death) प्रकरणी मयत तरुणाचा चुलत भाऊ श्रीनिवास राजेश्वर महादावाड वय २९ वर्ष रा. पाळज ता. भोकर जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास पोह संतोष व्यवहारे करीत आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याने चक्कर येऊन पडल्यामुळे तरुण वैद्यकीय प्रतिनिधीचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026