परभणी गुप्तेश्वर मंदिर

परभणीत राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धाराचे काम संथगतीने...?

Parbhani Gupteshwar Temple: परभणी जिल्ह्यातील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम निम्नस्तरीय व संथगतीने सुरू आहे. ग्रामस्थांनी गुणवत्ता व गतीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

परभणीत राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धाराचे काम संथगतीने...?

Parbhani Gupteshwar Temple

कामाची गती व गुणवत्ता नित्कृष्ट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

पुरातत्व विभाग व जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी

परभणी (Parbhani Gupteshwar Temple) : गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धाराचे काम अत्यंत संथगतीने व नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत या ऐतिहासिक वास्तुच्या कामाकडे पुरातत्व विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी धारासूर वासीय ग्रामस्थांतुन केली जात आहे.

परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा व राज्य संरक्षित स्मारक म्हणून शासन दरबारी नोंद असलेल्या गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील तेराव्या शतकातील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामाला ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरुवात करण्यात आली. राज्य संरक्षित स्मारक (Parbhani Gupteshwar Temple) गुप्तेश्वर मंदिर जतन व संवर्धन जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात होऊन अडीच वर्ष झाले तरी या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन कामासाठी मोजकेच कारागीर व कामगार असल्याने जीर्णोद्धाराचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे ग्रामस्थातुन बोलल्या जात असुन गुप्तेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडील पायऱ्यांच्या खालील भागात असलेला मंदिराचा मुख्य पाया (फाउंडेशन) सुमारे ५ ते ६ फूट खोदकाम करून काळी माती काढून मजबुतीकरण करणे आवश्यक असुन मंदिर मजबुतीकरणात अत्यंत महत्त्वाचे असलेले हे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचे सांगत या कामासंदर्भात परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना मंदिर कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी वेळोवेळी सांगण्यात आले.

मात्र जिल्हा प्रशासन तसेच पुरातत्त्व विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे ऐतिहासिक वारसा व राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धाराचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे तसेच संथगतीने होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गंगाखेड तालुक्यातीलच नव्हे तर परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला गती देऊन कामाची गुणवत्ता तपासने अत्यंत गरजेचे असुन पुरातत्व विभागासह जिल्हा प्रशासनाने या कामाकडे त्वरित लक्ष देऊन प्रत्यक्ष पाहणी करत मंदिर जीर्णोद्धारच्या कामाची गती वाढविण्याची सूचना संबंधित ठेकेदारांना देत कामाच्या गुणवत्ते संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी धारासूर वासीय ग्रामस्थातुन केली जात आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026