नवा मोंढा पोलिस

परभणीत कार मधून रोकडची बॅग पळविणार्‍याला पकडले..

Nava Mondha Police: परभणी शहरात वसमत रोडवर पोलिसांना शोधत गेल्यावर, एका व्यक्तीने कारमधून पळवलेल्या रोकडच्या बॅगला पकडला गेला. हे घटना फिर्यादीच्या कार्यालय

परभणीत कार मधून रोकडची बॅग पळविणार्‍याला पकडले..

Nava Mondha Police

 

परभणी शहरातील वसमत रोडवरील घटना नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल...!

परभणी (Nava Mondha Police) : कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून दुसर्‍याने गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेली रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला. यावेळी त्याला पाठलाग करत पकडण्यात आले. ही घटना सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास वसमत रोडवर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी दोन जणांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक सुरेशराव डफुरे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे मध्यवर्ती बँक पाथरी शाखेत कार्यरत आहेत. २ जुलै रोजी परभणीतील मुख्य कार्यालयात बैठक असल्याने फिर्यादी व त्यांच्या कारचे चालक दिपक उगले परभणी येथे आले. बैठकीला उशीर असल्याने व्यवस्थापकाचे चालक रोहित साळवे यांच्या सोबत मिळून पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारी नाष्टा करण्यासाठी आले.

यावेळी त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला उभी केली. फिर्यादी पुढील सीटवर बसलेले होते. तर चालक दिपक उगले, रोहित साळवे हे दोघे जण हॉटेल मध्ये नाष्टा आणण्यासाठी गेले. यावेळी एक इसम कार जवळ आला. त्याने खिडकीची काच वाजविली. फिर्यादीने काच खाली केली असता संबंधित व्यक्तीने बाहेर पैसे पडल्याचे सांगितले. तेंव्हा दरवाजा उघडून पाहत असताना दुसर्‍या एका व्यक्तीने कारच्या मागील सीटवर ठेवलेली पाच हजार रुपये रोकड असलेली पिशवी घेऊन पळ काढला.

यावेळी त्याला दिपक उगले, रोहित साळवे यांनी पाहिले. त्याचा पाठलाग केला असता संबंधिताने धक्काबुक्की केली. आरडाओरड करत संबंधिताला पकडण्यात आले. रोकडच्या बॅगसह त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गेटजवळ असलेल्या पोलिसांच्या मदतीने नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संबंधिताची चौकशी केली असता त्याने आपले नाव गौतम रविचंद्रन रा. तामिळनाडू, असे सांगितले. तर त्याचा दुसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी संबंधितावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. डोंबे करत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026