परभणी विनयभंग प्रकरण

परभणीत विनयभंग, मारहाण प्रकरणातील आरोपींचा अपील फेटाळला

Parbhani molestation case: परभणीत विनयभंग व मारहाण प्रकरणातील आरोपींनी दाखल केलेले अपील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून, दिवाणी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे.

परभणीत विनयभंग, मारहाण प्रकरणातील आरोपींचा अपील फेटाळला

Parbhani molestation case

 

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा कायम

परभणी (Parbhani molestation case) : विनयभंग व मारहाणीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींनी दाखल केलेले अपील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावत दिवाणी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने १२ मार्च २०१८ रोजी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात नमूद केले होते की, सकाळी घरासमोरील अंगण झाडत असताना आरोपी कल्याण शेषराव लांडे हा तिच्याजवळ आला आणि तिला जबरदस्तीने घरात नेऊन विनयभंग केला. आरडाओरड करू नये म्हणून तिचे तोंड दाबून झटापट केली. त्यावेळी पीडितेचा पती तेथे आला असता आरोपीने त्यास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर आरोपीचे वडील शेषराव लांडे व अर्जुन लांडे यांनीही लाकडी दांड्याने पीडिता व तिच्या पतीस मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

या (Parbhani molestation case) प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोह वाय. एम. खान यांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केले. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी २ सप्टेंबर २०२१ रोजी आरोपी कल्याण शेषराव लांडे यास एक वर्ष सक्तमजुरी व तसेच १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तर आरोपी शेषराव आश्रोबा लांडे व अर्जुन शेषराव लांडे यांना चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर समज देत नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय, परभणी येथे अपील दाखल केले होते.

सदर प्रकरणाची (Parbhani molestation case) सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एन. आर. नाईकवाडे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्पेâ अ‍ॅड. आनंद गिराम यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शुक्रवार ८ मे रोजी आरोपींचे अपील फेटाळून लावत दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. आनंद गिराम यांनी काम पाहिले. तसेच पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि सुरेश चव्हाण, पोह वैशाली बिंडे, वंदना आदोडे, धबडगे यांनी काम पाहिले.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
‘लोकांचं मनोरंजन करता करता मीच ड्रामा झालो’; कोर्टात राजपाल यादव भावुक; १.१५ कोटी जमा, उर्वरित ८५ लाखांसाठी मुदत

‘लोकांचं मनोरंजन करता करता मीच ड्रामा झालो’; कोर्टात राजपाल यादव भावुक; १.१५ कोटी जमा, उर्वरित ८५ लाखांसाठी मुदत

चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवांनी सुप्रीम कोर्टात १.१५ कोटींचा डिमांड ड्राफ्ट दिला. उर्वरित ८५ लाखांसाठी कोर्टाने दोन आठवड्यांची मुदत दिली.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार

समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार

Retired Court Employee Andolan: उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आंदोलन

Oct 05, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026