पातूर ग्रामपंचायत निवडणुक

पातूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तयारी; १० सप्टेंबरला तहसील कार्यालयात प्रक्रिया

Patur Gram Panchayat Election: अकोला जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदांच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पातूर तालुक्यासाठी सरपंच पदाच्या आरक्षण

पातूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तयारी; १० सप्टेंबरला तहसील कार्यालयात प्रक्रिया

Patur Gram Panchayat Election

पातूर (Patur Gram Panchayat Election) : अकोला जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदांच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पातूर तालुक्यासाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार सरपंच पदांच्या आरक्षणात बदल करण्यात आले आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांनंतर उर्वरित सरपंच पदांचे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तसेच खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.

अकोला जिल्ह्यातील एकूण ५३१ ग्रामपंचायतींपैकी ९१ सरपंच पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, तर २६७ सरपंच पदे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाचीही तरतूद करण्यात आली आहे. पातूर तालुक्यातील आरक्षण सोडतीची प्रक्रिया तहसील कार्यालय, पातूर (नवीन इमारत, हॉल) येथे सकाळी ११ वाजता पूर्ण होईपर्यंत चालणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या (Patur Gram Panchayat Election) आरक्षण सोडतीकडे पातूर तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांसह राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे. कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. प्रशासनाने संबंधित नागरिकांनी आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.