पातूर नगरपरिषद निवडणूक

सदस्य पदासाठी सात उमेदवारांचे अर्ज दाखल; सोमवारी उसळणार गर्दी

Patur Municipal Council Election: पातूर नगरपरिषदेची बहुप्रतीक्षित निवडणूक येत्या २० जून रोजी होणार असून, शहरातील राजकीय रणधुमाळीला आता जोरदार वेग आला आहे. दिनांक १८ मे पासून सदस्य आणि नगराध्यक्ष पद

सदस्य पदासाठी सात उमेदवारांचे अर्ज दाखल; सोमवारी उसळणार गर्दी

Patur Municipal Council Election

पातूर (Patur Municipal Council Election) : पातूर नगरपरिषदेची बहुप्रतीक्षित निवडणूक येत्या २० जून रोजी होणार असून, शहरातील राजकीय रणधुमाळीला आता जोरदार वेग आला आहे. दिनांक १८ मे पासून सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवार दिनांक २२ मे रोजी सदस्य पदासाठी एकूण सात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध पक्ष व इच्छुक उमेदवारांच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत.

प्रभागनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज:
आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये प्रभाग क्रमांक २ आणि ३ मधील उमेदवारांचा समावेश आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

प्रभाग २ -सर्वसाधारण जागा, आनंद रामभाऊ तायडे
प्रभाग २-ब- सर्वसाधारण महिला जागा, अलका सुरेंद्र उगले
प्रभाग ३ -सर्वसाधारण जागा, कैलास मोतीराम उगले
प्रभाग ३ -सर्वसाधारण जागा, अजय गजानन पाटील
प्रभाग ३- सर्वसाधारण जागा, राजू लक्ष्मण उगले
प्रभाग ३-ब - सर्वसाधारण महिला जागा, पूनम सचिन सिंह बायस
प्रभाग ३-क-  सर्वसाधारण महिला जागा,  निशा संजय निखाडे

सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा महत्त्वाचा दिवस
नगरपरिषद निवडणुकीसाठी (Patur Municipal Council Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २५ मे आहे. मात्र, दरम्यानच्या काळात शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असल्याने, प्रत्यक्षात सोमवार (२५ मे) हाच अर्ज दाखल करण्याचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. यामुळे सोमवारी नगरपरिषद कार्यालयात इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पातूर शहरात विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चिती, आघाड्या, बंडखोरी आणि प्रचाराची प्राथमिक तयारी सुरू झाली असून आगामी काही दिवसांत निवडणुकीचे वातावरण आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

संबंधित सामग्री

पातूर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी सय्यद नईम सय्यद यासीन व रफिकुद्दीन सय्यद तहजीबुद्दीन सौदागर यांची निवड 

पातूर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी सय्यद नईम सय्यद यासीन व रफिकुद्दीन सय्यद तहजीबुद्दीन सौदागर यांची निवड 

Patur Municipal Council: पातूर नगर परिसदेच्या विशेष सभेत काँग्रेस आणि विकास योद्धा मंचाच्या उमेदवारांना सदस्यपदी स्वीकृत केले गेले. नावनिर्देश पुढील दोघांना दिली गेली.

Jul 14, 2026
पातुरात लोकशाहीचा उत्सव; नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आज मतदान

पातुरात लोकशाहीचा उत्सव; नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आज मतदान

पातुर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, २० जून २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.

Jun 20, 2026
पातुर निवडणूक रणधुमाळी: जिल्हाधिकारी वर्षा मीना व पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा धडक आढावा

पातुर निवडणूक रणधुमाळी: जिल्हाधिकारी वर्षा मीना व पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा धडक आढावा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पातूर शहरातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळाले.

Jun 03, 2026