पायदळ पुलावरून पडून 60 वर्षीय शंकर पोट्टी मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू

बाजार करून घरी परतत असताना पायदळ पुलावरून खाली पडल्याने शंकर पोट्टी मडावी (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहेरी परिसरात घडली.

पायदळ पुलावरून पडून 60 वर्षीय शंकर पोट्टी मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू

Pedestrian Bridge Fall

बाजार करून घरी परतत असताना घडली घटना.... अहेरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह स्वगावी रवाना

अहेरी (Pedestrian Bridge Fall) : बाजार करून घरी परतत असताना पायदळ पुलावरून खाली पडल्याने शंकर पोट्टी मडावी (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहेरी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर पोट्टी मडावी हे बाजार करून घरी परतत होते. यावेळी पायदळ पुलावरून जात असताना अचानक तोल जाऊन ते पुलावरून खाली पडले. या अपघातात त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेनंतर त्यांना पुढील कार्यवाहीसाठी अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (पोस्टमॉर्टम) आणण्यात आले. दरम्यान ही माहिती मिळताच काँग्रेस नेते डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांना याची खबर मिळाली. त्यांनी तत्काळ आपल्या कार्यकर्त्यांना रुग्णालयात पाठवून पोस्टमॉर्टमसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या स्वगावी पाठविण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

संबंधित सामग्री

२५ वर्षांपासून मुक्या जनावरांसाठी अखंड जलसेवा; कापडसिंगीतील माजी सरपंच प्रकाशराव हराळ यांचा उपक्रम ठरतोय आदर्श

२५ वर्षांपासून मुक्या जनावरांसाठी अखंड जलसेवा; कापडसिंगीतील माजी सरपंच प्रकाशराव हराळ यांचा उपक्रम ठरतोय आदर्श

 वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील अनेक तलाव, ओढे, नाले व विहिरी कोरड्या पडत असून पाण्यासाठी जनावरांची भटकंती वाढली आहे.

May 18, 2026
नांदेड जिल्ह्यात कार व मोटरसायकलचा भीषण अपघात 

नांदेड जिल्ह्यात कार व मोटरसायकलचा भीषण अपघात 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात हदगाव ते तामसा मार्गावर 22 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.

Apr 23, 2026