जि.प. फंड मॉनिटरींग सिस्टीम तांत्रिक कारणामुळे बंद

जिल्हा परिषदेकडील  देयकांची अदायगी ही जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीम नुसार करण्यात येऊन त्यानुसार जिल्हा परिषदेचा मासिक व वार्षिक लेखा तयार करण्यात येतो

जि.प. फंड मॉनिटरींग सिस्टीम तांत्रिक कारणामुळे बंद

Pension Gratuity Issue

सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपदान व अंश राशिकरण रक्कम जमा होण्यास विलंब

हिंगोली (Pension Gratuity Issue) : जिल्हा परिषदेकडील  देयकांची अदायगी ही जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीम नुसार करण्यात येऊन त्यानुसार जिल्हा परिषदेचा मासिक व वार्षिक लेखा तयार करण्यात येतो. काही तांत्रिक  कारणामुळे प्रस्तुत प्रणालीतील लेखांकनाची सुविधा सध्या बंद करण्यात आली असल्याने आर्थिक तरतुद जिल्हा परिषद स्तरावर उपलब्ध असुनही सेवानिवृत्त शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण तसेच वैद्यकीय देयकांच्या रक्कमा सेवानिवृत्त शिक्षकांच्या बॅक खात्यात जमा करण्यास अडचन निर्माण झाली आहे. सेवानिवृत्त शिक्षक  त्यांच्या उपदान अंशराशीकरण रक्कम बॅक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्याल्याकडे सतत पायपीट करत आहेत.

याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर चौकशी करून संबंधितअस्थापना प्रमुख यांना विचारणा केली असता शासनस्तरावरून प्रणाली बंद आहे. ही प्रणाली बंद असल्याने रक्कमा जमा करण्यासअडचण येत आहे .ही प्रणाली १ एप्रिल २०२६ पासुन बंद असल्याने कधी सुरू होईल हे मात्र निश्चित नसल्याने सेवानिवृत्त शिक्षक त्रस्त झाले आहे. राज्यात सर्वच जिल्हयात ही परिस्थिती असल्याने सेवानिवृत्त शिक्षकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. राज्यात अनेक जिल्हा परिषदेमध्ये २०२४ पासुन सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना उपदान व अंशराशीकरण रक्कम आर्थिक तरतुद उपलब्ध नसल्याने मिळाल्या नाहीत. यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नगरपरिषद महानगर पालिका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाने शासनस्तरावर व शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना आर्थिक तरतुद उपलब्ध करून देण्यांची मागणी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देऊन राज्याध्यक्ष शिवानंद भरले व राज्यकार्यकारी अध्यक्ष  सुभाष जिरवणकर यांनी केली होती.

सर्व जिल्हा परिषदेला आर्थिक तरतुद फेब्रुवारी व मार्च महिन्यात शिक्षण संचालक कार्यालयाकडून निधी वितरित करण्यात आला होता. ३१ मार्च २०२६ पर्यत जिल्हा स्तरावरून पंचायत समिती स्तरावर वितरीत होऊन पंचायत समिती स्तरावरून सेवानिवृत्त शिक्षकांच्या बॅक खात्यावर जमा करणे आवश्यक होते. परंतु ही कार्यवाही वेळेत पंचायत समिती स्तरावरून न झाल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांच्या बॅक खात्यात वैद्यकीय परिपुर्ती देयकांची रक्कम तसेच उपदान व अंशराशीकरण रक्कम अध्यापही जमा न झाल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकामध्ये असंतोष  पसरला आहे .रक्कम  वेळेत जमा न झाल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना आर्थिक समस्येला समोर जावे लागत आहे. या बाबत सेवानिवृत्त शिक्षक संघटनेकडे तक्रार करत असुन न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नगरपरिषद महानगर पालिका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यकार्यकारी अध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन देऊन प्रणाली लवकर सुरू करावी अशी मागणी केली आहे. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचे वैद्यकीय परिपुर्ती देयकांची तसेच उपदान व अंशराशीकरण रक्कम  वेळेत सेवानिवृत्त शिक्षकांच्या बॅक खात्यात जमा न करणा-यावर जबाबदारी निश्चित करून दप्तर दिरंगाई अंतर्गत कारवाई  करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.

Sep 29, 2026
दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

Polytechnic Engineering Admission: दहावीनंतर बारावी आणि अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकमधून पदविका करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

Sep 29, 2026
शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

मिसाळवाडी शाळेतील शिक्षक नियुक्तीवरून वाद चिघळला. ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून, प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sep 19, 2026
मा. सु. पा. महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त स्वयंशासन दिन उत्साहात

मा. सु. पा. महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त स्वयंशासन दिन उत्साहात

शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्थानिक मा. सु. पा. महाविद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Sep 05, 2026