Pimpri Chinchwad Building Collapse

पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसात दोन मजली इमारत कोसळली; 14 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात मोठी दुर्घटना घडली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसात दोन मजली इमारत कोसळली; 14 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

Pimpri Chinchwad Building Collapse

मोशी कचरा डेपोजवळील दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, आपत्ती निवारण पथक आणि पोलीस घटनास्थळी; परिसरात भीतीचे वातावरण

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला असतानाच मोशी कचरा डेपोजवळील दोन मजली इमारत अचानक कोसळली. घटनेच्या वेळी इमारतीमध्ये नागरिक उपस्थित असल्याने सुमारे 14 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व यंत्रणांनी संयुक्तपणे बचावमोहीम सुरू केली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शहरात गेल्या काही तासांपासून सतत पाऊस सुरू असून या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत ही इमारत कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सध्या बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून स्थानिक नागरिकही बचावकार्यात प्रशासनाला सहकार्य करत आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने विविध ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला असून वारीच्या पालखी मार्गातही बदल करण्यात आला आहे. संभाव्य धोके लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांना वेळोवेळी हवामान आणि पावसाबाबतचे इशारे दिले जात आहेत.

दरम्यान, दुपारच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू असताना ही इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच जखमींबाबतही प्रशासनाकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसून बचावकार्य सुरू असल्याने पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.

संबंधित सामग्री

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुण्यातील ९० कोटींच्या वेलस्ली रस्ता निविदेवरून वाद; आमदाराने आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप, तर अधिकाऱ्यांनाही हक्कभंगाची दमबाजी.

Sep 29, 2026
नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घरात पहाटे तरुणाची घुसखोरी. बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि 10 मीटर दोरी सापडल्याने तपासाला वेग.

Sep 28, 2026