हिंगोली पोलिस छापे

हिंगोलीत आयजींच्या दौर्‍यामुळे पोलिसांचे छापे; २६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल

Hingoli Police Raids: नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे आज २० ऑगस्टला हिंगोलीत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये गुन्हे आढावा व जनसंवाद बैठक त्यानंतर कळमनुरी पोलिस..

हिंगोलीत आयजींच्या दौर्‍यामुळे पोलिसांचे छापे; २६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल

Hingoli Police Raids

हिंगोली (Hingoli Police Raids) : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे आज २० ऑगस्टला हिंगोलीत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये गुन्हे आढावा व जनसंवाद बैठक त्यानंतर कळमनुरी पोलिस ठाण्याला भेट देणार आहेत. या दौर्‍याच्या निमित्ताने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अर्लट झाली आहे. या निमित्ताने कळमनुरी व बासंबा पोलिसांनी झन्ना मन्ना जुगारावर छापे मारून तब्बल २६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले. या छापेसत्रामुळे हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्याने चांगले पाय रोवल्याचे सिध्द होत आहे. 

आज २०  ऑगस्ट रोजी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात सकाळी १० वाजता मंत्रालय कर्मचार्‍यांची बैठक देखील घेणार आहेत. सकाळी ११.३० वाजता अज्ञांकीत कक्ष, दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, शाखा प्रभारी अधिकारी व ठाणेदारांची गुन्हे आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी ३ ते ४.३० दरम्यान जनसंवाद बैठक घेतल्यानंतर सायंकाळी ५ वाजता कळमनुरी पोलिस ठाण्याला भेट देणार आहेत. 

या (Hingoli Police Raids) दौर्‍याचे औचित्य साधून पोलिस यंत्रणा अवैध धंद्यावरील कारवाईच्या शोधात होती. त्याच निमित्ताने कळमनुरी व बासंबा पोलिस ठाणे हद्दित सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर छापा मारून २६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २ लाख ७७ हजार ७१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी २६ जुगार्‍यांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. 

तिखाडी येथील छाप्यात १० जुगार्‍यांकडून १८७४० रुपये जप्त
हिंगोली :
तालुक्यातील तिखाडी येथे बासंबा पोलिसांनी झन्ना मन्ना जुगारावर छापा मारून १० जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून १८ हजार ७४० रुपये जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी अवैध धंद्या विरूध्द आक्रमक धोरण स्विकारले आहे. त्यातच आता २० ऑगस्ट गुरूवार रोजी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे हिंगोलीच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा अर्लट झाली आहे. तिखाडी येथे  राजू पवार यांच्या टिनपत्राच्या समोरील रस्त्यावर झन्ना मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती बासंबा पोलिसांना १८ ऑगस्टला मिळाली. रात्री १०. ४० वाजता पोलिस पथकाने छापा मारला.

या ठिकाणी नगदी १८ हजार ७४० रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक सुखदेव वाठोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश परसराम पवार, गोपाल अंबादास आडे, साहेबराव मोहन राठोड, संतोष सुभाष राठोड, वैभव मारोती ठोके, संतोष वसराम राठोड, गोपिचंद बाबुराव चव्हाण, सचिन सुभाषराव मस्के सर्व रा. तिखाडी, नारायण केवा जाधव रा. बोरजा, उध्दव पतींगराव मस्के रा. वर्‍हाडी या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस देऊन जागेवरच सोडले.

धानोरा जहागिर येथील छाप्यात १६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल
 कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहाँगीर येथे पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १६ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, १६ अँड्रॉईड मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ५८ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.१८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास धानोरा जहाँगीर गावातील पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेत काही जण गोलाकार बसून पत्त्यांवर पैसे लावून ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ, पोलीस निरीक्षक जमीर नाईक, पोलिस उपनिरीक्षक मदन संभाजी गव्हाणे , कैलास गुंजकर, होमगार्ड धुळे यांच्या पथकाने तेथे छापा छापा टाकला.

या कारवाईत ११ हजार ९७० रुपये रोख, १६ अँड्रॉईड मोबाईल, किंमत २ लाख ४७ हजार रुपये, तसेच ५२ पत्ते असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ५८ हजार ९७० रुपये आहे. या प्रकरणी भागवत विश्वनाथ पोटे, गणेश कचरू शेंबडे, संजय फकीरराव भिसे, अंकुश शंकर पोटे, अंकुश श्रीरंग पोटे, विजय देवराव डुकरे, शेख नाजीक शेख मुस्ताक, नरहरी दत्त शेळके, अविनाश दत्तराव शेमडे, ज्ञानेश्वर बाबाराव इगळे, ज्ञानेश्वर विश्वनाथ खुडे, आकाश मोतीराम भागवतकर, नामदेव सूर्यभान चिरमाडे, बजरंग माणिक चिरमाडे, आंबादास माधव कळमकर आणि अंकुश चांगदेव खरवाडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाणे करीत आहेत. प्रकरण सध्या तपासावर आहे.

अवैध व्यवसाय निर्मुलन मोहीम
नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी  परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसाय मोहीम -२ सुरू केली आहे. या अंतर्गत अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, आमली पदार्थ, घातक शस्त्र आदी विरूध्द परिणामकारक कारवाई केली जात आहे. अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याकरीता उमाप यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याने चांगले पाय रोवल्यामुळे प्रत्येक दिवशी छाप्याच्या माध्यमातून अवैध धंदे उघड होत आहेत. त्यामुळे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्या विरूध्द कठोर पाऊले उचलावे लागतील असे बोलले जात आहे.

संबंधित सामग्री

गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

Giramwadi Gambling Raid: तालुक्यातील गिरामवाडी शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर १ सप्टेंबरला पोलिसांनी छापा मारून १ लाख ७ हजार ६४० रुपयाचा मुद्देमाल जप्त

Sep 01, 2026
झन्ना-मन्ना जुगारावर छापा; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

झन्ना-मन्ना जुगारावर छापा; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

तालुक्यातील वाकोडी शिवारात झन्ना-मन्ना जुगारावर पोलिसांनी छापा मारून पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, १ लाख २ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Aug 22, 2026
परभणीत ‘तिर्रट’ जुगारावर छापा; ६ दुचाकी, ३ मोबाईलसह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

परभणीत ‘तिर्रट’ जुगारावर छापा; ६ दुचाकी, ३ मोबाईलसह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणीसावरगाव येथे ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.

Aug 22, 2026
अवैध धंद्याची माहिती दडविल्याने बळसोंडच्या पोलिस पाटील महिलेवर निलंबनाची कारवाई

अवैध धंद्याची माहिती दडविल्याने बळसोंडच्या पोलिस पाटील महिलेवर निलंबनाची कारवाई

Police Patil Suspension: अकोला बायपास ते गारमाळ जाणार्‍या रस्त्यालगत पोलिसांनी टाईम बाजार मटका जुगारावर छापा मारला होता. कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असल्यास त्याची माहिती पोलिस..

Aug 19, 2026
तिखाडी येथील झन्ना मन्ना जुगारावर छापा; दहा जुगार्‍यांवर गुन्हा दाखल

तिखाडी येथील झन्ना मन्ना जुगारावर छापा; दहा जुगार्‍यांवर गुन्हा दाखल

Tikhadi Gambling Raid: तालुक्यातील तिखाडी येथे बासंबा पोलिसांनी झन्ना मन्ना जुगारावर छापा मारून १० जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून १८ हजार ७४० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Aug 19, 2026