तहसीलदारांकडून विशेष भरारी पथकांची नियुक्ती, गुन्हे दाखल करण्याचा इशारा
चिखली (Project illegal water supply) : सन २०२६ मध्ये तालुक्यात पर्जन्यमान अपुरे झाल्यामुळे जलाशय, तलाव, नदी, कालवे व बंधाऱ्यांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. आगामी काळात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. चिखली तालुक्यातील सर्व जलस्त्रोतांसह डोंगरशेवली व ब्राह्मणवाडा लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाण्याचा अनधिकृत व बेकायदेशीर उपसा रोखण्यासाठी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विजय सवडे यांनी दि. ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष आदेश (क्रमांक/कावि/नै.आ./५१०/२०२६ व ५११/२०२६) जारी केले आहेत. या आदेशान्वये तालुक्यातील जलस्त्रोतांसाठी आणि विशेष प्रकल्पांसाठी स्वतंत्र भरारी पथके (Flying Squads) गठीत करण्यात आली आहेत.
भरारी पथकांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक:
१. डोंगरशेवली प्रकल्प भरारी पथक:
आर. एम. शिंदे (शाखा अभियंता, जलसंपदा विभाग, सिंचन शाखा, चिखली) – पथक प्रमुख (मो. ८८०५४४१८८३)
प्रविण जाधव (शाखा अभियंता, महावितरण, शाखा कार्यालय शेंबा) – सदस्य (मो. ७८७५७६३५७४)
जयसिंग राजपूत (पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पो.स्टे. अमडापूर) – सदस्य (मो. ९९६०८७६८६९)
संजय सरागे (मंडळ अधिकारी, धोडप) – सदस्य (मो. ९०११०४४८४७)
व्ही. बी. कोळसे (ग्राम महसूल अधिकारी/तलाठी, डोंगरशेवली) – सदस्य (मो. ९६८९३३३१९६)
व्ही. एस. शेळके (ग्राम पंचायत अधिकारी/सचिव, डोंगरशेवली) – सदस्य (मो. ९५४५३०४०७२)
डी. यू. सावळे (ग्राम पंचायत शिपाई, डोंगरशेवली) – सदस्य (मो. ८८०६०५६०५१)
२. ब्राह्मणवाडा लघु पाटबंधारे प्रकल्प भरारी पथक:
एम. बी. मिरकुटे (शाखा अभियंता, जलसंपदा विभाग, सिंचन शाखा, उदयनगर) – पथक प्रमुख (मो. ८६६८३३६६३१)
कोकवडे (शाखा अभियंता, महावितरण, शाखा कार्यालय अमडापूर) – सदस्य (मो. ७८७५३५२३३०)
किशोर मोरे (मंडळ अधिकारी, अमडापूर) – सदस्य (मो. ७३८७५७८७५४)
जयसिंग राजपूत (पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पो.स्टे. अमडापूर) – सदस्य (मो. ९९६०८७६८६९)
भुषण काळे (ग्राम महसूल अधिकारी/तलाठी, अमडापूर भाग-३) – सदस्य (मो. ८४८५०९२६९९)
शरद काळे (ग्राम पंचायत अधिकारी/सचिव, अमडापूर) – सदस्य (मो. ९९२३३३२४४८)
राजु बावणे (ग्राम पंचायत शिपाई, अमडापूर) – सदस्य (मो. ९०२११२१४२८)
३. तालुक्यातील सर्व तलाव व जलस्त्रोत भरारी पथक:
पथक प्रमुख (मृद व जलसंधारण विभाग):
एस. एस. खरपास (सहा. अभियंता श्रेणी-२, मृद व जलसंधारण, जि.प. उपविभाग, बुलढाणा) - मो. ९८९०८८५४६३
ए. एस. पाटील (कनिष्ठ अभियंता, मृद व जलसंधारण, जि.प. उपविभाग, देऊळगाव राजा) - मो. ९०४९४९६१६७
स्नेहलता खामकर (कनिष्ठ अभियंता, मृद व जलसंधारण उपविभाग, चिखली) - मो. ७८८७९६३८६१
मनोज देठे (कनिष्ठ अभियंता, मृद व जलसंधारण उपविभाग, चिखली) - मो. ८३२९१६३३१६
६३३१६
पोलीस प्रशासन (संबंधित पोलीस ठाणे अधिकारी):
भुषण गावडे (पो.स्टे. प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन चिखली) - मो. ९९२२८०७८६१
जयसिंग राजपूत (पो.स्टे. प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन अमडापूर) - मो. ९९६०८७६८६९
रूपेश शक्करगे (पो.स्टे. प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन अंढेरा) - मो. ९९२३७५६१४३
निलेश सोळुके (पो.स्टे. प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन रायपूर) - मो. ८८८८८६१४१८
६१४१८
महावितरण विभाग अधिकारी व कर्मचारी:
प्रविण जाधव (उपअभियंता, महावितरण, बुलढाणा) - मो. ७८७५७६३५७४
पडघान (कनिष्ठ अभियंता, महावितरण, मेरा) - मो. ७८७५७६३५८३
प्रताप कदम (प्रधान तंत्रज्ञ, महावितरण, मेरा) - मो. ९८५०५२२१८७
भिमटे (सहाय्यक अभियंता, महावितरण, चिखली ग्रामीण २) - मो. ७०३०९०६८८४
संदीप जाधव (प्रधान तंत्रज्ञ, महावितरण, चिखली ग्रामीण २) - मो. ७३९७९८४१७७
७९८४१७७
महसूल विभाग (संबंधित मंडळ अधिकारी):
किशोर मोरे (मंडळ अधिकारी, अमडापूर) - मो. ८४५९३६१४७४
मंगल सवतकर (मंडळ अधिकारी, उदयनगर) - मो. ९८२२६४०५६५
नितिन काळे (मंडळ अधिकारी, कोलारा व हाटणी) - मो. ९६७३८१९९१४
संजय चौधरी (मंडळ अधिकारी, चांधई) - मो. ९९७५२९०६२७
भगवान पवार (मंडळ अधिकारी, चिखली) - मो. ९७६३३१८७५७
संजय सरागे (मंडळ अधिकारी, धोडप) - मो. ९०११०४४८४७ (याशिवाय संबंधित पेठ, एकलारा, मेरा खुर्द, शेलगाव अटोळ मंडळांचे मंडळ अधिकारी, संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) व ग्रामपंचायत शिपाई यांचाही या पथकात समावेश आहे.)
वेश आहे.)
कडक कायदेशीर कारवाई व कडक निर्देश:
मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या ३० सप्टेंबर २०२६ च्या पत्रातील निर्देशानुसार ही विशेष कारवाई राबवण्यात येत आहे.
आकस्मिक व नियमित तपासणी: भरारी पथके तालुक्यातील सर्व जलाशय, नदी, तलाव, कालवे, बंधारे व प्रकल्पांमधील जलसाठ्याची नियमित आणि अचानक (Randomly) पाहणी करतील.
कडक कायदेशीर पावले: महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ व केंद्रीय विद्युत कायदा २००३ मधील तरतुदींनुसार अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर खालीलप्रमाणे कारवाई केली जाईल:
अनधिकृत पाण्याचे विद्युत व डिझेल पंप संच तात्काळ जप्त करणे.
बेकायदेशीरपणे घेतलेली वीज जोडणी (Power Connection) खंडित करणे.
नियमबाह्य उपसा करणाऱ्यांवर आर्थिक दंड आकारणे.
संबंधितांवर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे.
सदर कारवाईचा शेतकरीनिहाय पंचनामा अहवाल दर गुरुवारी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, बुलढाणा व तहसील कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विजय सवडे यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या या धडक भूमिकेमुळे तालुक्यातील जलस्त्रोतांवर बेकायदेशीरपणे पंप लावून पाण्याचा उपसा करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.