Public Awareness

बाजीप्रभूनगरमध्ये पोलिसांची भेट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहर पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध भागात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

बाजीप्रभूनगरमध्ये पोलिसांची भेट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Public Awareness

चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पी.एस.आय. जाधव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांची जनजागृती

मलकापूर : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहर पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध भागात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने बाजीप्रभूनगर येथील परिसराला पी.एस.आय. जाधव यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली.

यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत चोरीच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. घर किंवा दुकान बंद करून बाहेर जाताना विशेष काळजी घ्यावी, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनासोबत नागरिकांचे सहकार्य आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे, असे यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले. नागरिकांनी आपल्या परिसरात जागरूक राहून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

मलकापूर शहरातील विविध चौक व परिसरांमध्ये कॉर्नर सभा, नागरिकांशी थेट संवाद आणि विविध माध्यमांतून जनजागृती करून पोलिसांकडून सुरक्षिततेचा संदेश दिला जात आहे. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्येही सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होत आहे.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

बुलढाण्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; ‘ट्रिगर-१’ लागू. आमदार चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश.

Sep 26, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
श्री गणेश विसर्जनासाठी मलकापूर शहर पोलिसांचे आवाहन

श्री गणेश विसर्जनासाठी मलकापूर शहर पोलिसांचे आवाहन

Malkapur Ganesh Visarjan: श्री गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यासाठी मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळे तसेच नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना..

Sep 24, 2026