कार अपघात

पुलाखाली कोसळली कार, प्रवासी गंभीर जखमी!

Car Bridge Accident: मानोरा-मंगरूळपीर महामार्गावर दि. ४ मे रोजी भीषण अपघात झाला. एका वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिल्याने कार पुलाखाली कोसळली. प्रवासी गंभीर जखमी झाले.

पुलाखाली कोसळली कार, प्रवासी गंभीर जखमी!

Car Bridge Accident

 

भरधाव वाहनाने मागून दिली धडक 

मानोरा (Car Bridge Accident) : मानोरा-मंगरूळपीर महामार्गावर अभयखेडा फाट्याजवळील वळणावरील पुलावर दि. ४ मे रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने मागून समोरच्या कारला जोरदार धडक दिल्याने कार पुलाखालील शेतात कोसळली. या (Car Bridge Accident) अपघातात कारमधील प्रवासी  जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

सविस्तर असे की, एमएच ३१ ईयू २०५० या क्रमांकाची मारुती सुझुकी कार पुलावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या एमएच २७ डीई २९६६ या वाहनाने तिला जोरदार मागून धडक दिली. या धडकेत एमएच ३१ ईयू २०५० कारचा चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार तीन - चार कोलांट्या खात थेट पुलाखालील शेतात जाऊन कोसळली.  

या अपघाताच्या घटनेत कारचा मागील भाग पूर्णपणे तुटून  काचा फुटल्या असून संपूर्ण कारचा चुराडा झाला आहे. (Car Bridge Accident) अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना कारमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असताना काही जखमींना वाशिम येथे हलवण्यात आले आहे. मानोरा-मंगरूळनाथ महामार्गावर अभयखेडा फाट्याजवळील हा वळणाचा पूल अपघातप्रवण क्षेत्र बनला असल्याने सबंधित विभागाने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026