Pune DJ Ban

पुण्यात दहीहंडी उत्सवात DJचा दणका; ८ बेस आणि ८ टॉप स्पीकर लावणाऱ्या मंडळावर गुन्हा दाखल

पुण्यात दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर DJच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

पुण्यात दहीहंडी उत्सवात DJचा दणका; ८ बेस आणि ८ टॉप स्पीकर लावणाऱ्या मंडळावर गुन्हा दाखल

Pune DJ Ban

पोलिसांची ४ बेस आणि ४ टॉप स्पीकरची मर्यादा; बिबवेवाडीतील श्रीकृष्ण तरुण मंडळाची साऊंड सिस्टिम जप्त

पुण्यात दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर DJच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवात DJवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या विद्यानंद बापट या तरुणाला अनेक पुणेकरांचा पाठिंबा मिळत असतानाच, आता दहीहंडी उत्सवातील ध्वनीप्रदूषणाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. बिबवेवाडी परिसरातील एका दहीहंडी मंडळावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुण्यातील दहीहंडी उत्सवातील ही पहिली कारवाई ठरली आहे.

बिबवेवाडी ओटा परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलिसांकडून पारंपरिक वाद्य वापरण्याची परवानगी घेतली होती. मात्र, लाऊडस्पीकरसंदर्भातील पोलिसांच्या लेखी आदेशाचे उल्लंघन करत मंडळाने निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साऊंड सिस्टिमचा वापर केला.

पोलिसांच्या नियमानुसार लाऊडस्पीकरसाठी ४ बेस आणि ४ टॉप स्पीकर वापरण्याची परवानगी होती. मात्र मंडळाकडून ८ बेस आणि ८ टॉप स्पीकर लावण्यात आले. त्यामुळे परिसरात ध्वनीप्रदूषण झाल्याची तक्रार निर्माण झाली आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी मंडळावर गुन्हा दाखल करत साऊंड सिस्टिम जप्त केली.

राहुल प्रकाश जगताप हे श्रीकृष्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत. यंदाच्या दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले हे पहिले मंडळ आहे.

दरम्यान, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच ध्वनीप्रदूषणाबाबत स्पष्ट इशारा दिला होता. दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाऊडस्पीकरच्या वापरासाठी ४ बेस आणि ४ टॉप यांनाच परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या मर्यादेपेक्षा अधिक स्पीकर लावून ध्वनीप्रदूषण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.

त्यामुळे दहीहंडी उत्सवात झालेल्या या पहिल्या कारवाईनंतर आगामी गणेशोत्सवात DJ आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी किती कडकपणे केली जाते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026
पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुण्यातील ९० कोटींच्या वेलस्ली रस्ता निविदेवरून वाद; आमदाराने आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप, तर अधिकाऱ्यांनाही हक्कभंगाची दमबाजी.

Sep 29, 2026
नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घरात पहाटे तरुणाची घुसखोरी. बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि 10 मीटर दोरी सापडल्याने तपासाला वेग.

Sep 28, 2026
अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला ‘मफलर’ नेत्याचा पर्दाफाश करण्याची घोषणा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला ‘मफलर’ नेत्याचा पर्दाफाश करण्याची घोषणा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला VSR कंपनी आणि ‘मफलर’ नेत्याबाबत पुरावे मांडणार.

Sep 28, 2026