Rahul Colony Nanded

नांदेडमध्ये धक्कादायक घटना; आईवर हल्ल्यानंतर मुलाची आत्महत्या, राहुल कॉलनीत खळबळ

शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनी येथे रविवारी रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे.

नांदेडमध्ये धक्कादायक घटना; आईवर हल्ल्यानंतर मुलाची आत्महत्या, राहुल कॉलनीत खळबळ

Rahul Colony Nanded

तरोडा नाका परिसरातील घटना; २६ वर्षीय प्रतीक चौथरेने ५० वर्षीय आईवर केला हल्ला, पोलिसांकडून तपास सुरू

नांदेड : शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनी येथे रविवारी रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. २६ वर्षीय प्रतीक चौथरे याने आपल्या ५० वर्षीय आईवर घरातच हल्ला केल्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या कृत्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कॉलनीत चौथरे कुटुंब राहते. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास प्रतीकने आईवर घरातच हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर प्रतीक दुसऱ्या खोलीत गेला आणि तेथे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले.

दरम्यान, घरातून संशयास्पद आवाज ऐकू आल्याने शेजाऱ्यांना घरात काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आला. त्यांनी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रतीकचे वडील नोकरीच्या कारणास्तव बाहेरगावी असतात. ते घरी नसतानाच ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

आईवर हल्ला केल्यानंतर प्रतीकने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून घटनेच्या विविध पैलूंचा तपास केला जात असून, घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या दुर्दैवी घटनेमागील कारणाचा शोध घेतला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

मराठवाड्यात पावसाची तूट असताना नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठक झाली. बैठकीतील काजू-बदामाच्या नाश्त्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर टीका सुरू झाली.

Sep 19, 2026
लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर आले. ‘I am a good fool’ या वाक्यामुळे चर्चेला उधाण आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Sep 16, 2026