रमेशभाई ओझा

गविख्यात भागवत कथावाचक रमेशभाई ओझा यांची अंध विद्यालयाला प्रेरणादायी भेट

Rameshbhai Ojha: प्रसिद्ध कथावाचक रमेशभाई ओझा यांनी अंध विद्यालयाला भेट देऊन दृष्टीबाधित मुलांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना प्रेरणा दिली.

गविख्यात भागवत कथावाचक रमेशभाई ओझा यांची अंध विद्यालयाला प्रेरणादायी भेट

Rameshbhai Ojha

हिंगोली (Rameshbhai Ojha) : भाईश्री रमेश भाई ओझा यांनी मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध विद्यालयाला भेट दिली. शाळेच्या कला दालनातील मुलांनी बनवलेल्या विविध वस्तूंची पाहणी करून त्यांच्या कलेचे मनःपूर्वक कौतुक केले. या प्रसंगी मुख्याध्यापक आशिष पिंगळकर यांनी शाळेची माहिती सविस्तर दिली. शाळा मंडळ अध्यक्ष सुनील देवडा यांच्या मनोगतानंतर भाईश्री रमेश भाई ओझा (Rameshbhai Ojha) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दृष्टीबाधित मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी पाच ज्ञानेंद्रिये हे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात असे सांगितले. "एक ज्ञानेंद्रियाची कमतरता असली तरी इतर चार मजबूत आहेत ही आठवण ठेवा. संगीताद्वारे ज्ञानप्राप्ती करा," असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी काढले. महिलांनी स्वतःला 'हाउसवाइफ' न समजता 'होममेकर' म्हणून ओळखावे, असा संदेश देत कार्यकर्त्यांचे उदाहरण देताना कथा आयोजन प्रमुख वकील मनीष साकळे यांच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले.

मुलांना भेटी वाटप
या वेळी मनीष साकळे यांनी मुलांसाठी ड्रेस, ब्रेल किट व चादरीची भेट आणली होती. कथावाचक रमेशभाई यांच्या हस्ते मुलांना सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गांधी सेवा ट्रस्टचे सचिव सुनिलभाऊ देवडा, कोषाध्यक्ष प्रकाशजी सोनी, सचिन बगडिया, मनीष साकळे, भरत चौधरी, सचिन गुंडेवार, विकास काप्रतवार, आशिष काबरा, ज्ञानेश्वर मामडे, आनंद अग्रवाल, संजय देवडा उपस्थित होते. भाईश्रींच्या भेटीने विद्यालय परिवार उत्साही झाला असून दृष्टीबाधित मुलांना नवे दृढनिश्चय मिळाला आहे.

संबंधित सामग्री

कथाकार प.पू रमेशभाई ओझा यांनी घेतले आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन

कथाकार प.पू रमेशभाई ओझा यांनी घेतले आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन

Rameshbhai Ojha: आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे 23 मार्च सोमवार रोजी प्रसिद्ध कथाकार परमपूज्य रमेशभाई ओझा यांनी पूजा व दुग्धाभिषेक करत दर्शन घेतले यावेळी मंदिर संस्था

Mar 23, 2026
‘आधुनिक शिक्षण पद्धतीत सनातन विचार असावा’: भाईश्री रमेशभाई ओझा

‘आधुनिक शिक्षण पद्धतीत सनातन विचार असावा’: भाईश्री रमेशभाई ओझा

Bhaishree Rameshbhai Ojha: सध्याच्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सनातन विचार समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे. आपली ओळख आपल्या परंपरेतूनच होते. प्रतिपादन भागवत कथा वाचक भाई श्री रमेश भाई ओझा यांनी केले.

Mar 19, 2026
Srimad Bhagwat Katha: हिंगोलीत श्रीमद् भागवत कथेची जय्यत तयारी

Srimad Bhagwat Katha: हिंगोलीत श्रीमद् भागवत कथेची जय्यत तयारी

१९ मार्चपासून रामलीला मैदानावर भागवत कथा उत्सव सुरू होईल, ज्यासाठी आंतरराष्ट्रीय कथाकार रमेशभाई ओझा सांगणार आहेत.

Mar 15, 2026