Ranjit Shirole

मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंचे निकटवर्तीय रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मनसेचे माजी प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; राज ठाकरेंना पुण्यात राजकीय धक्का?

मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंचे निकटवर्तीय रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Ranjit Shirole

पुण्यातील मनसेचे माजी प्रदेश सरचिटणीस काँग्रेसच्या वाटेवर; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, शिरोळे कुटुंबाचे काँग्रेसशी जुने संबंध

पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) आणखी एक धक्का बसला आहे. मनसेच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असलेले आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळलेले रणजित शिरोळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश पार पडला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची वाटचाल अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आपण हा निर्णय घेतल्याचे शिरोळे यांनी स्पष्ट केले.

रणजित शिरोळे यांच्या प्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शिरोळे कुटुंबाचे काँग्रेसशी अनेक वर्षांपासून राजकीय आणि कौटुंबिक संबंध आहेत. याशिवाय आम आदमी पक्षातील काही सहकारीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, शिरोळे कुटुंबाचा काँग्रेसशी जुना संबंध

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रणजित शिरोळे यांचे पक्षात स्वागत केले. शिरोळे यांच्या कुटुंबाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरोळे कुटुंबाच्या अनेक पिढ्या पुण्याच्या मूळ शहरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबाला काँग्रेसच्या विचारांचा आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. रणजित शिरोळे यांचे वडील काँग्रेसच्या माध्यमातून नगरसेवक झाले होते. त्यानंतर त्यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती, असे सपकाळ यांनी नमूद केले.

दरम्यान, स्पष्ट राजकीय दृष्टी आणि ठोस अजेंडा असलेल्या नेत्यांसाठी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे दरवाजे खुले असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळात अशा अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होईल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.

कोण आहेत रणजित शिरोळे?

रणजित शिरोळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत कार्यरत होते. पक्षाने त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली होती. २००९ मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवली होती. राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना केली जात होती.

त्यांचे वडील श्रीकांत शिरोळे यांनी पुणे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तर त्यांचे आजोबा भाऊसाहेब शिरोळे हे पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. भाऊसाहेब शिरोळे यांनी पुण्याचे बिनविरोध महापौर म्हणूनही काम केले होते. तसेच त्यांनी आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते.

मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रणजित शिरोळे यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कात मनसेचा दीपोत्सव होणार नाही

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कात मनसेचा दीपोत्सव होणार नाही

महाराष्ट्रातील दुष्काळामुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कात मनसेचा दीपोत्सव होणार नाही. फटाके आणि रोषणाई टाळण्याचे आवाहन.

Nov 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! मिनाक्षी शिंदेंनी राम पूर्णेकरांसाठी मागितले पोलीस संरक्षण

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! मिनाक्षी शिंदेंनी राम पूर्णेकरांसाठी मागितले पोलीस संरक्षण

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! मिनाक्षी शिंदेंनी राम पूर्णेकरांसह कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.

Nov 03, 2026
अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार? प्रताप सरनाईकांचा मोठा दावा; फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष

अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार? प्रताप सरनाईकांचा मोठा दावा; फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष

अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार? प्रताप सरनाईकांचा मोठा दावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष.

Nov 03, 2026
हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सय्यद बासीद यांचे सदस्यत्व अपात्र; जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सय्यद बासीद यांचे सदस्यत्व अपात्र; जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

Hingoli Nationalist Congress Party: महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ अन्वये तिसरे अपत्य झाल्याच्या कारणावरून हिंगोली नगर परिषदेचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य.

Nov 02, 2026
INDIA आघाडीची रामलीला मैदानावर भव्य महारॅली; राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादवांसह अनेक दिग्गज नेते सहभागी

INDIA आघाडीची रामलीला मैदानावर भव्य महारॅली; राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादवांसह अनेक दिग्गज नेते सहभागी

INDIA Ramlila Maidan Rally: मतदार यादीतील कथित अनियमितता आणि विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेसप्रणीत INDIA आघाडीने आज रविवारी (1 नोव्हेंबर) दिल्लीत शक्तिप्रदर्शन केले.

Nov 01, 2026