रेशन कार्ड प्रकरण

श्रीमंतांचा गरिबांच्या घासावर डल्ला; २६६० रेशनकार्डांचा ‘सफाया’, १३,६९० जणांना झटका!

Ration card Case: केंद्र शासनाच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत उदगीर तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अपाञ लाभार्थ्यांची मोठी छाननी करण्यात आली आसून. या तपासणीत २ हजार ६६० शिधापत्रिका रद्द

श्रीमंतांचा गरिबांच्या घासावर डल्ला; २६६० रेशनकार्डांचा ‘सफाया’, १३,६९० जणांना झटका!

Ration card Case

हणमंत केंद्रे
उदगीर (Ration card Case) :
 केंद्र शासनाच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत उदगीर तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अपाञ लाभार्थ्यांची मोठी छाननी करण्यात आली आसून. या तपासणीत २ हजार ६६० शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असून, त्यावरील तब्बल १३ हजार ६९० लाभार्थी अन्न्न सुरक्षेच्या अन्नधान्याच्या लाभातून वगळण्यात आले आहेत.अन्न सुरक्षा योजनेच्या  पात्रता निकषांत न बसणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा रेशनचा लाभ बंद करण्यात आला आसून त्यांना पांढर्‍या शिधापञिकेत वर्ग करण्यात आले आहे.

पात्र आणि गरजू कुटुंबांनाच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने शिधापत्रिकांची माहिती विविध शासकीय यंत्रणांच्या नोंदींशी पडताळण्यात आली. सीबीडीटी, जीएसटी आणि एमसीए विभागांच्या नोंदींच्या आधारे शिधापत्रिकांची तपासणी करण्यात आली. आयकर भरणारे तसेच शासनाच्या निकषांनुसार अपात्र ठरणारे लाभार्थी या छाननीत आढळून आले.त्यांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात आले आहे.'मिशन सुधार’अंतर्गत शिधापत्रिकांवरील माहिती अद्ययावत करण्यासोबतच लाभार्थ्यांची पात्रता तपासली जात आहे.

अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांचा अन्नधान्याचा लाभ बंद करून पात्र आणि गरजू कुटुंबांना योजनांचा लाभ प्राधान्याने मिळावा, यावर भर देण्यात येत आहे. उदगीर तालुक्यातील कारवाईमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थी आणि शिधापत्रिकांच्या संख्येत बदल झाला आहे. संबंधित शिधापत्रिका शुभ्र (पांढऱ्या) शिधापत्रिकेत वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.शासनाच्या निकषांत न बसणाऱ्या २,६६० शिधापत्रिकांवरील १३ हजार ६९० लाभार्थी वगळण्यात आल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्रता तपासणीला वेग आला आहे. शिधापत्रिकांच्या नोंदी अद्ययावत करून पात्र लाभार्थ्यांपर्यंतच अन्नधान्याचा लाभ पोहोचविण्यावर प्रशासनाचा भर आहे. मिशन सुधार’अंतर्गत विविध विभागांच्या नोंदींच्या आधारे होणारी पडताळणी पुढेही सुरू राहणार असल्याने शिधापत्रिकांची तपासणी आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे.

उदगीर तालुक्यातील शिधापत्रिकांचे चित्र:

अंत्योदय योजना:  शिधापत्रिका ४,५४७    लाभार्थी २१,६२१
प्राधान्य कुटुंब योजना:   ४७,१५७ शिधापञिका,   २,१६,६७८ लाभार्थी.
एनपीएच प्रवर्गात:   १,५४३ शिधापञीका,     ५,९२४ लाभार्थी
केसरी शिधापञिका:  ५,७३४ शिधापञिका,    २१,६३२ लाभार्थी

उदगीर तालुक्यातील अन्नसुरक्षायोजनेतुन २,६६० शिधापञिका व १३,६९० लाभार्थी वगळले आहेत. एकूण कार्यरत शिधापत्रिका ५९,००० तर  २,६५,८५५ लाभार्थी आहेत

“केंद्र शासनाच्या ‘मिशन सुधार’ योजनेअंतर्गत उदगीर तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेतील अपात्र लाभार्थी व शिधापत्रिकांची पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत २,६६० शिधापत्रिका व १३,६९० लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील श्वेत अर्थात पांढऱ्या शिधापत्रिकांची संख्या वाढली आहे. ‘मिशन सुधार’पूर्वी तालुक्यात २,७६३ श्वेत शिधापत्रिका होत्या. त्यात २,६६० शिधापत्रिकांची भर पडल्याने आता ही संख्या ५,४२३ झाली आहे. या कारवाईमुळे अन्नसुरक्षा योजनेचा लाभ पात्र आणि गरजू लाभार्थ्यांनाच मिळण्यास मदत होणार आहे.”
-सुमित्रा सिंधू अण्णाराव इलमले, पुरवठा निरीक्षण अधिकारी, उदगीर

टैग्स: Ration card Case