रत्नागिरीत परदेशी नोकरीच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक; दोन भावांवर गुन्हा

विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आणि कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीकराची ५० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. 

रत्नागिरीत परदेशी नोकरीच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक; दोन भावांवर गुन्हा

Ratnagiri Fraud Case

रत्नागिरी (Ratnagiri Fraud Case​​​​​​​) : विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आणि कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीकराची ५० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे.  या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन सख्ख्या भावांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली येथील सज्जाद अहमद खान यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार इसाम इरफान जांभारकर आणि अस्लम इरफान जांभारकर अशी आरोपींची नावे असून, ते रत्नागिरीतील मिरजोळे परिसरात वास्तव्यास आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही फसवणूक १ जुलै २०२५ ते १ मे २०२६ या कालावधीत घडली. आरोपींनी खान यांना परदेशात कामगार पाठवून मोठे कमिशन मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून खान यांनी ५६ जणांना परदेशात नोकरी मिळवून देण्यासाठी प्रत्येकी ८५ हजार रुपये या प्रमाणे एकूण सुमारे ५० लाख रुपये रोख स्वरूपात आरोपींना दिले.

मात्र, आरोपींनी संबंधित कामगारांना नियोजित देशात किंवा नोकरीवर न पाठवता इतरत्र पाठवले. त्यामुळे या सर्व कामगारांची मोठी गैरसोय झाली. अखेर सज्जाद खान यांना स्वतःच्या खर्चाने या ५६ जणांना पुन्हा भारतात परत आणावे लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खान यांनी रत्नागिरी गाठून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

संबंधित सामग्री

युरोपमध्ये नोकरीचे आमिष; नागपूरच्या महिलेला पोर्तुगालमध्ये विकल्याचा आरोप, आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

युरोपमध्ये नोकरीचे आमिष; नागपूरच्या महिलेला पोर्तुगालमध्ये विकल्याचा आरोप, आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

परदेशात आकर्षक पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागपूरच्या एका २८ वर्षीय महिलेला पोर्तुगालमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Aug 09, 2026
अंधश्रद्धेचा बळी? साक्रीत दोन जणांची निर्घृण हत्या,भोंदू अटकेत

अंधश्रद्धेचा बळी? साक्रीत दोन जणांची निर्घृण हत्या,भोंदू अटकेत

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे.

May 17, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना; बिश्नोई गँगशी संबंधित दोघांकडून फर्निचर मॉलवर गोळीबार

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना; बिश्नोई गँगशी संबंधित दोघांकडून फर्निचर मॉलवर गोळीबार

पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

May 16, 2026
पातूर–बाळापूर मार्गावर भीषण अपघात; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

पातूर–बाळापूर मार्गावर भीषण अपघात; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाडेगाव–पातूर मार्गावरील बाबूळगाव फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

May 15, 2026
मुंब्रा हत्याकांड उघड; प्रेम, पैसा आणि विश्वासघाताचा थरारक शेवट

मुंब्रा हत्याकांड उघड; प्रेम, पैसा आणि विश्वासघाताचा थरारक शेवट

मुंब्रा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे.

May 15, 2026