चिखली (Retired Teachers Meeting) : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची मासिक सभा शुक्रवार (दि. ५ जून) रोजी चिखली पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. तालुका कार्यकारिणीच्या या सभेत तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना निमंत्रित करून त्यांच्या विविध समस्या व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित गट विमा, शासकीय जोड विमा, एकाच पदावर २४ वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर मिळणारी निवड श्रेणी, संगणक वसुलीची कपात, सेवानिवृत्त विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना रजा रोखीकरणाचा लाभ देणे, केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती संदर्भातील वेतनवाढ वसुली परत करणे, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारे उपदान व अंशराशीकरण १५ दिवसांच्या आत अदा करणे आणि ई-कुबेर प्रणालीनुसार प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच पेन्शन मिळावी आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. याबाबत विविध ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
सभेला तालुका अध्यक्ष तथा राज्य सरचिटणीस गजानन नावकर, जिल्हा उपाध्यक्ष गजानन देवकर, एल. एम. राजपूत आणि शेख चांद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. जे. इंगळे व गजानन रिंढे यांना संघटनेचे सभासदत्व प्रदान करण्यात आले. तसेच उपस्थित आजीव सभासदांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सभेत मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत पंचायत समिती चिखली व जिल्हा परिषद बुलढाणा येथील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन (Retired Teachers Meeting) देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अनंत राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका कार्याध्यक्ष विजुबापू देशमुख यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक शेजोळ सर, दत्तात्रय येवले, रवींद्र बावस्कर, कांबळे सर, सदानंद वाघ, अजिज सर यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.
सेवानिवृत्त शिक्षक चर्चा
सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा; निवेदन देण्याचा ठराव
Retired Teachers Meeting: महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची मासिक सभा शुक्रवार (दि. ५ जून) रोजी चिखली पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहात पार पडली
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Retired Teachers Meeting
टैग्स:
Retired Teachers Meeting