रिक्षाचालक महामंडळ

रिक्षाचालकांवर महामंडळ नोंदणीची सक्ती थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन

Rickshaw Drivers Association: रिक्षाचालक संघटनेने परिवहन मंत्र्यांना निवेदन देऊन महामंडळ नोंदणीची सक्ती थांबवण्याची मागणी केली. अन्यथा, त्यांनी राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

रिक्षाचालकांवर महामंडळ नोंदणीची सक्ती थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन

Rickshaw Drivers Association

​टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे परिवहन मंत्र्यांना साकडे; आरटीओ प्रशासनाला निवेदन

​नांदेड (Rickshaw Drivers Association) : राज्यातील रिक्षाचालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा'च्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत केली जाणारी सक्ती त्वरित थांबवावी, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 'ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती' आणि 'टायगर ऑटो रिक्षा संघटने'च्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन पाठवण्यात आले. नांदेडचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश शिंदे व दिनेश पाटील यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, मागील २० वर्षांपासून रिक्षाचालक (Rickshaw Drivers Association) स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची मागणी करत होते. मात्र, शासनाने कोणत्याही प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता हे महामंडळ स्थापन केले. या मंडळासाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क आणि ३०० रुपये वार्षिक फी बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अंधेरी, बोरीवली, कल्याण आणि नांदेडसह राज्यातील अनेक आरटीओ कार्यालयांमध्ये या महामंडळाची पावती असल्याशिवाय परवाना नूतनीकरण किंवा पासिंगची कामे केली जात नाहीत. प्रशासनाची ही भूमिका पूर्णपणे बेकायदेशीर असून रिक्षाचालकांवर अन्याय करणारी असल्याचे टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष अहेमद बाबा यांनी म्हटले आहे.
​
​कल्याणकारी महामंडळ नोंदणीच्या नावाखाली अडकवून ठेवलेली आरटीओची कामे तत्काळ सुरू करावीत. (Rickshaw Drivers Association) इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षांच्या अनिर्बंध नोंदणीमुळे स्थानिक रिक्षा व्यवसायावर गदा येत असून त्यावर त्वरित स्थगिती आणावी.अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने २३ मार्च रोजी दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नसल्यामुळे, आता रिक्षाचालकांचे प्रश्न न सुटल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

​याप्रसंगी मराठवाडा कार्याध्यक्ष अहेमद बाबा, टायगर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अहेमद , शहराध्यक्ष मुखिद पठाण, शेख तयब, गंगाधर सरोदे, संजय शेळके, मोहम्मद साबिर, वसीयुद्दीन इनामदार, शेख फारूख, सोनसळे मामा, लहुजी संघटनेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026