रिसोड आक्षेपार्ह पोस्ट

आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या महिलेस अटक करण्याची मागणी

Risod Objectionable Post: इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित मोहम्मद सल. व त्यांच्या पत्नी हजरत आयशा रजि. यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नाझिया इलाही खान या माथेफिरू महिलेस तात्काळ अटक करून कारवाई

आक्षेपार्ह  पोस्ट टाकून समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या महिलेस अटक करण्याची मागणी

Risod Objectionable Post

रिसोड () : इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित मोहम्मद सल. व त्यांच्या पत्नी हजरत आयशा रजि. यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नाझिया इलाही खान या माथेफिरू महिलेस तात्काळ अटक करून कारवाईची मागणी रिसोड येथील मुस्लिम समाजाने केली आहे. नाझिया इलाही खान ही महिला आपल्या सोशल मीडियावर इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद सल. व हजरत आयशा सिद्दीका यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजामध्ये द्वेष पसरवत असून देशात अशांतता निर्माण करण्याचा हेतू परस्पर प्रयत्न करीत आहे.

सदर महिलेच्या फेसबुक अकाउंट वर सर्व आक्षेपार्ह मजकूर व पोस्ट उपलब्ध असून या माथेफिरू महिले विरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करून तिचा फेसबुक अकाउंट बंद करण्यात यावा, अशी मागणी रिसोड पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांना दि.24 जून रोजी दिलेल्या निवेदना द्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना मोहम्मद अजमल रजा,सय्यद रहबर अली,मोहम्मद आरिफ रज़ा,नजिरी काज़ी,शेख सरदार,फैय्याज़ अहेमद,साजिद खान पठाण,मोहम्मद युसुफ,नाजिम खान,हनिफ खान उपस्थित होते.

संबंधित सामग्री

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून, सोशल मीडियावर केली बदनामी 

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून, सोशल मीडियावर केली बदनामी 

Marriage Sexual Assault: पोलिस स्थानक हद्दीतील एका गावातील तरुणी सोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले नंतर पुढे सदर तरुणी सोबत विविध फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी

Aug 19, 2026