रिसोड–लोणार मार्ग कार अपघात

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

Risod-Lonar Road Car accident: रिसोड–लोणार मार्गावर दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव टिप्परने कारला धडक दिल्याची घटना मांगवाडी फाट्याजवळ

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

Risod-Lonar Road Car accident

 

रिसोड–लोणार मार्गावरील मांगवाडी फाट्याजवळ थरार;
कारचे मोठे नुकसान, टिप्परच्या वेगावर नियंत्रणाची मागणी

रिसोड (Risod-Lonar Road Car accident) : रिसोड–लोणार मार्गावर दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव टिप्परने कारला धडक दिल्याची घटना मांगवाडी फाट्याजवळ घडली. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झाली नाही; मात्र धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.मिळालेल्या माहितीनुसार, कार आणि टिप्पर दोन्ही लोणारच्या दिशेने जात असताना मांगवाडी फाट्याजवळ टिप्परने कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी टिप्परची कारला धडक बसल्याने काही काळ घटनास्थळी थराराचे वातावरण निर्माण झाले.अपघातात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या (Risod-Lonar Road Car accident) मार्गावर रेती वाहतूक करणारे टिप्पर वेगाने धावत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.भरधाव टिप्परच्या वेगावर नियंत्रण ठेवणे तसेच ओव्हरटेक करताना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत संबंधित यंत्रणांनी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.