रिसोड शहर बंद

बुद्ध मूर्ती विटंबना प्रकरणी रिसोड शहर कडकडीत बंद; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Risod city closed: रिसोड शहरात बुद्ध मूर्तीच्या विटंबनेमुळे शांततापूर्ण बंद ठेवण्यात आला. नागरिकांनी निषेध मोर्चा काढून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

बुद्ध मूर्ती विटंबना प्रकरणी रिसोड शहर कडकडीत बंद; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Risod city closed

रिसोड (Risod city closed) : मराठवाड्यातील वाढोणा परिसरातील बुद्ध टेकडीवरील तक्षशिला बुद्धविहार येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना करून तोडफोड व जाळपोळ केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ५ मे रोजी रिसोड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला. १ मे रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून बौद्ध अनुयायी व सकल बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या.

या (Risod city closed) निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत शांततेत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात या घटनेला समाजाच्या अस्मितेवर झालेला आघात असल्याचे नमूद करून आरोपींची तात्काळ अटक व कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चात महिला, युवकांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव दल व पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, निषेध मोर्चा पूर्णतः शांततेत पार पडला असून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

Sep 24, 2026