नायब तहसीलदार देशपांडे यांना निवेदन; हेक्टरी १ लाख मदत व १२ तास वीजपुरवठ्याची मागणी
रिसोड (Risod Taluka drought) : रिसोड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी अनेक भागांतील पिके करपण्याच्या मार्गावर असून, शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली रिसोड तालुका काँग्रेस समितीचे तालुकाध्यक्ष रामेश्वर गणपतराव देवकर यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार देशपांडे साहेब यांना निवेदन देऊन रिसोड तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रिसोड तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होणार असून त्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
तालुकाध्यक्ष रामेश्वर गणपतराव देवकर यांनी शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधत, रिसोड तालुका तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी केली. तसेच दुष्काळाच्या परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणीही त्यांनी केली.यासोबतच पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसाला १२ तास सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. पावसाअभावी पिके वाचविण्यासाठी सिंचनाची सुविधा अत्यंत महत्त्वाची असल्याने वीजपुरवठ्याबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका रामेश्वर गणपतराव देवकर यांनी मांडली.
पावसाने ओढ दिल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून, शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी, दुष्काळी उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात आणि आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस तालुका समितीचे अध्यक्ष रामेश्वर गणपतराव देवकर यांनी केली.यावेळी अर्जुन पाटील खरात, बबन पाटील गारडे, खुशाल पाटील लांडे, रामेश्वर देवकर (तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी), अकबर भाई (शहराध्यक्ष, रिसोड), रोहित दांदडे (नगरसेवक), बंडू वानखेडे (नगरसेवक), अकबर पठाण (नगरसेवक), सिकंदर खान (नगरसेवक), समीर शेख (नगरसेवक), रियाज पठाण (नगरसेवक), अजीस भाई (माजी नगरसेवक), राजु खांबलकर जिल्हा सचिव मोहंमद फेज (नगरसेवक), इरफान कुरेशी, तैवाज खान (समाजसेवक), सचिन पराड (सरपंच, बायखेड), संजय सदार, तान्हाजी गाडे (सरपंच), गोपाल मोरे, माया मोरे, भानदास पाटील, बदी संत, उत्तमराव तिखे, बबनराव सानप (संचालक), बाळू भाऊ पाडरे, प्रसाद गाजरे, सतीश गाडे (संचालक), नानासाहेब देशमुख, बबनमामा सरकटे, सचिन भोपाळे, रमेश चोपडे, भगवान चोपडे, ज्ञानेश्वर अवचार (सरपंच, किनखेड), नितीन शीरसाठ, विलास गायकवाड, विशाल मालक, दिगांबर गाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली रिसोड तालुका काँग्रेस समितीचे तालुकाध्यक्ष रामेश्वर गणपतराव देवकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घेऊन रिसोड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि पिके वाचविण्यासाठी दिवसाला १२ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.