चिंचांबा पेन बंधारा

पैनगंगा नदीवरील चिंचांबा पेन बंधाऱ्यातील कचरा तात्काळ हटविला..

Chinchamba Pen Dam: चिंचांबा-पेनगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात लाकडे, झाडे व काडी-कचरा अडकला होता. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह अडथळित होऊन परिसरातील शेतीला पाण्याचा धोका

पैनगंगा नदीवरील चिंचांबा पेन बंधाऱ्यातील कचरा तात्काळ हटविला..

Chinchamba Pen Dam

 

भाजपाचे लखनसिंह ठाकूर यांच्या मागणीला जल व मृदासंधारण विभागाचा तत्पर प्रतिसाद

रिसोड (Chinchamba Pen Dam) : तालुक्यातील चिंचांबा-पेनगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात लाकडे, झाडे व काडी-कचरा अडकला होता. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह अडथळित होऊन परिसरातील शेतीला पाण्याचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजपाचे लखनसिंह ठाकूर यांनी जल व मृदासंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तात्काळ कचरा हटविण्याची मागणी केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत कार्यकारी अभियंता  फेरवानी व उपविभागीय अधिकारी  पंकज उगले  यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे दुसऱ्याच दिवशी विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहोचवून पैनगंगा नदीवरील (Chinchamba Pen Dam) चिंचांबा पेन बंधाऱ्याजवळ पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेले अडकलेले लाकूड, झाडे व काडी-कचरा पूर्णपणे हटविण्यात आला. त्यामुळे आता नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यास मदत झाली आहे. या तातडीच्या कार्यवाहीमुळे किनखेडा, पेडगाव, मसालापेन व कवठा परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. बंधाऱ्याच्या परिसरातील शेतीचे संभाव्य नुकसान टळण्यास मदत झाली असून भविष्यात पाण्याचा प्रवाह अडथळित होण्याची शक्यताही कमी झाली आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न गांभीर्याने घेऊन अवघ्या एका दिवसात यंत्रणा कामाला लावून प्रत्यक्ष कार्यवाही केल्याबद्दल भाजपाचे लखनसिंह ठाकूर यांनी जल व मृदासंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता फेरवानी  उपविभागीय अधिकारी  पंकज उगले  तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. “शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि त्यांच्या हिताचे संरक्षण हीच आमची प्राथमिकता असून, प्रशासनाने अशाच पद्धतीने तत्परतेने कार्यवाही करावी,” असे लखनसिंह ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026
कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026
२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल, ‘सरसकट मदत कुठे?’

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल, ‘सरसकट मदत कुठे?’

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवारांनी हेक्टरी एक लाख मदत आणि कर्जमाफीची मागणी करत सरकारवर टीका केली.

Sep 26, 2026