Road Accident

परभणीत ट्रक-स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; पाचजण जखमी

परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील किन्होळा-खरवडे शिवारात ट्रक आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक झाली.

परभणीत ट्रक-स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; पाचजण जखमी

किन्होळा-खरवडे शिवारातील घटना; जखमी मानवत शहरातील रहिवासी

परभणी : परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील किन्होळा-खरवडे शिवारात ट्रक आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन पाच तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानवत येथील पाच तरुण स्कॉर्पिओ क्र. एमएच २३ बीएच ४७४७ मधून मानवतकडे जात होते. याचवेळी मानवतकडून परभणीकडे जाणाऱ्या ट्रक क्र. एमएच ३८ एक्स ५३६९ सोबत स्कॉर्पिओची धडक झाली.

या अपघातात स्कॉर्पिओच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात मानवत शहरातील महेबूब मन्सुरी, वसीम कुरेशी, अक्रम कुरेशी, सय्यद महेफुज आणि शेख अदनान हे पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, किन्होळा-खरवडे शिवारातील महामार्गावर मोठा खड्डा पडलेला असून, या खड्ड्यामुळेच अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, संबंधित यंत्रणेने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026