संभाजी ब्रिगेड आंदोलन 

वसमतमध्ये संभाजी ब्रिगेडचे 'रस्ता रोको आंदोलन 

Sambhaji Brigade Protest:  संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या विद्यार्थ्यावर झालेला लाठी हल्ला यासह विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कवठा टी पॉईंट येथे झालेल्या आंदोलन

वसमतमध्ये संभाजी ब्रिगेडचे 'रस्ता रोको आंदोलन 

Sambhaji Brigade Protest

 

शेतकरी समस्या, पेपरफुटी, लोडशेडिंगसह अनेक मागण्यांसाठी आंदोलन

वसमत (Sambhaji Brigade Protest) : संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या विद्यार्थ्यावर झालेला लाठी हल्ला यासह विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कवठा टी पॉईंट येथे झालेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी ठप्प झाली होती मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांनी दिला.

वसमतवळील कवठा टी-पॉईंट येथे 25 जुलै रोजी संभाजी ब्रिगेडच्यावतीने  'रस्ता रोको आंदोलन' करण्यात आले शेतकऱ्यांच्या समस्या लोडशेडिंग,नीटपेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला, पिक विमा यांसह शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शासनाकडे  हळद पीक विमा तात्काळ मंजूर करावा ,पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला (Sambhaji Brigade Protest) करणाऱ्यांवर कारवाई करावी, ग्रामीण भागातील अघोषित लोडशेडिंग बंद करावी.या प्रमुख मागण्यासह शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध मागण्या मांडण्यात आल्या शासनाच्या धोरणाचा यावेळी उपस्थित पदाधिकारी नेत्यांनी निषेध नोंदवला या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर, तानाजी भोसले यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते रस्ता रोको मुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आंदोलन अत्यंत शांततेत पार पडले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित सामग्री

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन; आमदार रामदास मसराम यांचे नेतृत्व 

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन; आमदार रामदास मसराम यांचे नेतृत्व 

NEET Paper Leak: नीट पेपर फुटी प्रकरणी लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटी, आरमोरी विधानसभा क्षेत्र वतीने आमदार रामदासजी मसराम यांच्या नेतृत्वात  रेल्वे बोगद्यानजीक पॉईंट वर भव्य रास्ता रोको आंदोलन

Jul 24, 2026
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक रस्त्यावर,55 हजार दंड वसूल

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक रस्त्यावर,55 हजार दंड वसूल

Kalamnuri Traffic Discipline: कळमनुरीच्या वाहतूक रस्त्यावर पोलीसने अवैध प्रवास, नियमांचा उल्लंघन आणि अडथळे तटस्थ करून 55 हजार रुपये दंड वसूल केले.

Jun 18, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे कृषी मंत्रीना कारवाईचे पत्र 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे कृषी मंत्रीना कारवाईचे पत्र 

Farmers Crop Insurance: नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन यांचे पिक विमा नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे तात्काळ कारवाई मागितली गेली. परिवर्तन शेतकरी संघटन

May 26, 2026