सरपंच पद आरक्षण

हिंगोली तालुक्यातील १११ ग्रा.पं.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Sarpanch post reservation: तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी  ९ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथील सभागृहात दुपारी १२ वाजता बैठक आयोजित

हिंगोली तालुक्यातील १११ ग्रा.पं.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Sarpanch post reservation

हिंगोली (Sarpanch post reservation) : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी  ९ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथील सभागृहात दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीस  राजेश सरवदे, उपजिल्हाधिकारी रोहयो जि.अ.का. हिंगोली तथा समन्वय अधिकारी यांच्या उपस्थितीत  श्रीकांत भुजबळ, तहसीलदार हिंगोली, श्रीमती मंगला मोरे, नायब तहसीलदार निवडणूक, प्रविण रणवीर सहा. महसूल अधिकारी, प्रशांत बोरसे, संतोष जाधव,सोनल भालेराव उपस्थित होते.या बैठकीत सन २०२५-२०३० या कालावधीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली असून अंतिम यादी पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जाती - एकूण १८ ग्रामपंचायती- आमला, अंधारवाडी, कानडखेडा खु., कारवाडी, चिंचोली, चिंचाळा, चोरजवळा, पिंपळदरी तर्पेâ बासंबा, पारोळा.अनुसूचित जाती (महिला) - ९ ग्रामपंचायती-खेर्डा, पातोंडा, पेडगाव, फाळेगाव, बोरी शिकारी, बासंबा, माळहिवरा, मालवाडी, सवड. अनुसूचित जमाती - एकूण ८ ग्रामपंचायती- कानरखेडा बु., केसापुर, नर्सी नामदेव, पिंपरखेड, महिला - आडगाव, दुर्गधामणी, पारडा, सिरसम बु.,नागरीकांचा मागास प्रवर्ग ओबीसी) - एकूण २९ ग्रामपंचायती-
अंभेरी, कनका, करंजाळा, काळकोंडी, खंडाळा, डिग्रस कर्‍हाळे, बेलुरा, बोरजा, माळधामणी, राजुरा, लोहरा, वडद, वर्‍हाडी, सावरखेडा, महिला - आंबाळा, इडोळी,कोथळज, खांबाळा, खेड, गिलोरी, जांभरून आंध, जामठी खु., डिग्रसवाणी,  बोराळवाडी, ब्रम्हपुरी, भटसावंगी, राहोली खु., लासिना, हानवतखेडा,सर्वसाधारण प्रवर्ग - एकूण ५६ ग्रामपंचायती-इसापुर, उमरखोजा, उमरा, कन्हेरगाव नाका, कलगाव, खडकद बु., टाकळी त.ना, दुर्गसावंगी, देऊळगाव रामा, नवलगव्हाण, नांदुरा, पळसोना, बोंडाळा, बोडखी, भटसावंगी तांडा, भांडेगाव, भिरडा, भोगाव, माळसेलु, येळी, लिंबाळा प्र.वा., वांझोळा, वैजापूर, सागद, सावरगाव बं., हिरडी, हिवराबेल, खरबी, सर्वसाधारण महिला - २७ ग्रामपंचायती- इंचा, कडती, कळमकोंडा बु., खानापूर चि., गाडीबोरी, घोटा, जयपूरवाडी, जांभरून तांडा, जोडतळा, दाटेगाव, देवठाणा, पहेणी, पांगरी, पिंपळखुटा, बळसोंड, बोराळा, भिंगी, राहोली बु., लिंबाळा मक्ता, लिंबी, लोहगाव,वरुड गवळी, संतुकपिंप्री, समगा, सरकळी, साटंबा, सावा, हिंगणी  या  गावांचा  समावेश आहे.

संबंधित सामग्री

पातुर तालुक्यात सन २०२५ ते २०३० कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

पातुर तालुक्यात सन २०२५ ते २०३० कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

Sarpanch post reservation: पातुर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) व सर्वसाधारण सरपंच पदाची आरक्षण सोडत (महिला आरक्षणासह)

Sep 10, 2026