शेंदुरजना हातपंप

शेंदुरजना (आढाव) येथील ७ हात पंपांपैकी ५ बंद!

Shendurjana hand pump: ७ हात पंपासाठी दिलेल्या ४.८७ लाख रुपयांचा खर्च अपूर झाला. उरलेली रक्कम शासनात जमली आहे. चार हातपंप सध्या काम करीत नाहीत, गावपंचायताने कामाचे तपासणी आदेश दिले.

शेंदुरजना (आढाव) येथील ७ हात पंपांपैकी ५ बंद!

Shendurjana hand pump

 

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे अपूर्ण; ग्रामपंचायतीला चौकशीचे आदेश! 

मानोरा  (Shendurjana hand pump) : १५  व्या वित्त आयोगाच्या सन २०२० - २०२१  च्या निधीतून मानोरा तालुक्यातील शेंदुरजना (आढाव ) येथे ७ नवीन विंधन विहीर हातपंप घेण्यासाठी ४ लाख ८७ हजार ४०८ रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ ५ हातपंप बसवण्यात आले असून, त्यातील ४ हातपंप सध्या बंद अवस्थेत आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्ता रवि राठोड यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी तक्रार केली होती. त्यानंतर ही चौकशी करून अहवाल संबंधितांनी सादर केला आहे. 

 जिल्हा परिषद यांत्रिकी उपविभाग यांनी दिलेल्या अहवालानुसार, शेंदुरजना (आढाव) येथे ७ पैकी ५ नवीन विंधन विहीर हातपंप बसवण्यात आले. एकूण ४ लाख १६ हजार ९९५ रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित ७०४१३ रुपये शासन खात्यात जमा आहेत.  निधी अपुरा पडल्याने २ हातपंप बसवले गेलेच नाहीत. बसवलेल्या ५ पैकी ४ हातपंपांना पाणी लागत नसल्याने ते कार्यरत नाहीत. या कामासाठी कंत्राटदार म्हणून सरपंच - सचिव, ग्रामपंचायत शेंदुरजना (आढाव) हे होते. सदर काम शासकीय जागेत झाले आहे की नाही याची खात्री ग्रामपंचायतीने करावी, असे निर्देश यांत्रिकी उपविभागाने दिले आहेत.  

संबंधित सामग्री

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे डांबरीकरण महिनाभरातच उखडले..

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे डांबरीकरण महिनाभरातच उखडले..

PM Gram Sadak Yojana: अतिसंवेदनशील आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अतिदुर्गम भागात वसलेल्या कोरची तालुक्यात कोट्यावधी किंमतीचे दोन पुल तसेच पुल वजा बंधारा वाहुन

Aug 14, 2026
कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

BJP Yuva Morcha: नगरपरिषद सांस्कृतिक भवन, देसाईगंज (वडसा) येथे झालेल्या आढावा बैठकीत कोरची तालुक्यातील कोटगुल व परिसरातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित व गंभीर प्रकरणांबाबत भाजप युवा मोर्चा

Aug 12, 2026