विधान परिषद निवडणूक

परभणी - हिंगोलीची जागा शिवसेनेला सुटण्याचे संकेत

Legislative Council Elections: परभणी-हिंगोलीच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला हिंगोलीची जागा सुटण्याची संकेत येत आहेत. नेत्यांचे संकेत सुटण्याच्या संकेत देण्यात आले

परभणी - हिंगोलीची जागा शिवसेनेला सुटण्याचे संकेत

Legislative Council Elections


मराठवाड्यातील आणखी एक बड्या नेत्याचे नाव चर्चेत
स्थानिक स्वराज्य  संस्था विधान परिषद निवडणूक

हिंगोली (Legislative Council Elections) : विधान परिषद निवडणुकी अंतर्गत जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्यात आलेली असताना परभणी - हिंगोलीची जागा शिवसेनेलाच सुटणार असल्याचे संकेत राजकीय गोटातून मिळत आहेत.  विधान परिषदेच्या निवडणूकी हिंगोली - परभणीची जागा कोणाला सुटेल या बाबत दोन आठवड्यांपासून सतत चर्चा सुरू आहे. महायुतीतील तीनही प्रमुख घटक पक्षांचे नेते आपआपल्या पध्दतीने यासाठी सक्रीय होते.

शिवसेनेत उमेदवारी मारणार्‍यांची सर्वाधिक संख्या हिंगोली जिल्ह्यातून होती तर भारतीय जनता पक्षाकडे परभणी जिल्ह्यात इच्छुकांची भलीमोठी यादी आहे. संख्या बळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा मजबूत असला तरी पक्षाकडे पाहीजे तसा उमेदवार नसल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, परभणीचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख  व माजी आमदार वैâ. कुंडलिक नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे अशी काही नावे चर्चेत आहेत.

भारतीय जनता पक्षात परभणी जिल्ह्यातील माजी मंत्री सुरेश वरपुडकर, संतोष मुरकुटे, गंगाधर बोर्डीकर अशी मोठी नावे चर्चेत आहेत. संख्या बळानुसार भारतीय जनता पक्ष दुसर्‍या क्रमांकावर असला तरी इतर पक्षांचे व काही अपक्ष नगरसेवक भारतीय जनता पक्षासोबत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीला असल्याचे भाजपनेते सांगत आहेत. आघाडीतील तिसरा घटक पक्ष शिवसेना शिंदे गटातून हिंगोली जिल्ह्यात इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. (Legislative Council Elections) युवासेना जिल्हा प्रमुख  राम कदम व राजू चापके हे उमेदवारी मागण्यात सर्वाधिक सक्रीय दिसत आहेत. असे असले तरी मावळते आमदार विप्लव बाजोरीया यांनी मतदारांची भेटी गाठी सुध्दा सुरू केल्या आहेत. अशात सोमवारी मराठवाड्यातील शिवसेनेचा माजी मंत्री असलेल्या एका बड्या नेत्याने ही जागा शिवसेनेला निश्चित झाली असुन या नेत्याच्या मुलाला उमेदवारी मिळणार असल्याचे पक्षाच्या काही नेत्यांना सांगितल्याची चर्चा आहे. यावरून परभणी - हिंगोलीची जागा शिवसेनेला सुटण्याची चिन्हे अधिक असल्याचा अंदाज बांधला जात आहे. 

दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उबाठाचे परभणी जिल्ह्यातील नेते डॉ. विवेक नावंदर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी असले तरी स्थानिकच्या मुद्यावरून दोन्ही जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांचाही आपल्याला छुपा पाठींबा असल्याचे डॉ. विवेक नावंदर यांचे समर्थक सांगत आहेत.

संबंधित सामग्री

“संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला वळंबा”; आमदार संतोष बांगर यांचा हल्लाबोल

“संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला वळंबा”; आमदार संतोष बांगर यांचा हल्लाबोल

MLA Santosh Bangar: हिंगोळ्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे गटाकडे संजय राऊत या नामांकनावर जोरदार टीक्याच्या आघाडीवर असलेल्या आरोपांचे उल्लेख

Jun 19, 2026
विधान परिषदेसाठी उद्या मतदान; मतदारांना शिवसेना उबाठासहीत अपक्ष उमेदवाराची प्रतिक्षा

विधान परिषदेसाठी उद्या मतदान; मतदारांना शिवसेना उबाठासहीत अपक्ष उमेदवाराची प्रतिक्षा

Legislative Council Election: परभणीला गेतेवारी मतदान साठी शिवसेनेच्या उमेदवारी डॉ. विवेक नावंदर व अपक्ष उमेदवारी सुशिल देशमुख यांच्याशी भेट न झाल्यामुळे मतदारांना धक्का लागला.

Jun 17, 2026
राष्ट्रवादीच्या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची रिक्त झालेली राज्यसभेची जागा कोणाच्या पदरी पडणार, याबाबत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Jun 06, 2026
शिवसेना एकत्रीकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले; संजय राऊत यांचा भाजपवर तीव्र हल्लाबोल

शिवसेना एकत्रीकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले; संजय राऊत यांचा भाजपवर तीव्र हल्लाबोल

राज्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत सुरू झालेल्या चर्चेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Jun 02, 2026
विधान परिषद निवडणूक 2026 :महायुतीत विधान परिषद जागावाटप निश्चित; भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार

विधान परिषद निवडणूक 2026 :महायुतीत विधान परिषद जागावाटप निश्चित; भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अखेर जागावाटप निश्चित झाले असून 17 जागांसाठी अंतिम फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे.

Jun 01, 2026