जिल्हा मध्यवर्ती बँक

जिल्हा मध्यवर्ती बँकेत शोभाताई सुभाषराव झनक यांचा मताधिक्यान विजय'..!

District Central Bank: जिल्हा मध्यवर्ती बँकेत शोभाताई सुभाषराव झनक यांच्या विजयाने सहकार क्षेत्रातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले, विरोधी गटाला मोठ्या फरकाने पराभवाचा धक्का दिला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत शोभाताई सुभाषराव झनक यांचा मताधिक्यान विजय'..!

District Central Bank

सहकार क्षेत्रात झनक गटाचे निर्विवाद वर्चस्व कायम

रिसोड (District Central Bank) : राजकीयदृष्ट्या व सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Shobhatai Janak) शोभाताई सुभाषराव  झनक यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालाने झनक गटाने सहकार क्षेत्रातील आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, विरोधी गटाला मोठ्या फरकाने पराभवाचा धक्का दिला आहे. (District Central Bank) अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीत एकुण 74 मते पडली होती. सुरुवाती पासुनच शोभाताई झनक यांचे पारडे जड दिसत होते.आणि निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले. विजयी उमेदवार श्रीमती ​शोभाताई सुभाषराव झनक यांना 59 मते तर विरोधी गटाचे उमेदवार​डॉ.विठ्ठल पाचरणे 13 मते पडली तर 2 मतदारांचे मतदान बाद झाले.​ विजयाचे ​शोभाताईं डनक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 46 मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला, जो या निवडणुकीतील चर्चेचा विषय ठरला आहे.


शोभाताई  झनक या रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या मातोश्री आहेत.स्वर्गीय रामराव झनक, माजी  मंत्री सुभाषराव झनक विद्यमान आमदार अमित झनक यांच्या पासून सुरू असलेला सहकाराचा वारसा शोभाताईंनी (Shobhatai Janak) या विजयाने अधिक भक्कम केला आहे. आमदार अमित झनक यांच्या कुशल नियोजना मुळे आणि कार्यकर्त्यांच्या फौजेमुळे हा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे.​ परिसरात गुलालाची उधळण आणि जल्लोष निकाल जाहीर होताच (District Central Bank) निवडणूक केंद्राबाहेर समर्थकांनी एकच गर्दी केली. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत हा विजय साजरा केला. या विजय मताधिक्यात विरोधकांची  ही मते असल्याने विरोधकांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

जनतेचा विश्वास सार्थ ठरला (शोभाताई झनक)

विजया नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शोभाताई झनक (Shobhatai Janak) म्हणाल्या की, ​"हा विजय माझा नसून बळीराजा परिवारावर  विश्वास ठेवणाऱ्या सर्व मतदार आणि कार्यकर्त्यांचा आहे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे आणि सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे ही माझी प्राथमिकता असेल. भविष्यात अधिक जबाबदारीने काम करून जनतेचा हा विश्वास मी कायम ठेवेन."​.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026