शेगाव (Shri Gajanan Maharaj Sansthan) : श्री गजानन महाराज संस्थान हे केवळ धार्मिक श्रद्धास्थान नसून सामाजिक उत्तरदायित्व जपणारी अग्रगण्य संस्था आहे. यापूर्वीही राज्यावर आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या वेळी संस्थानने नेहमीच मदतकार्यात योगदान दिले आहे. संस्थानच्या वतीने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहायता निधी'त 1 कोटी 11 लाख रुपयांचा निधी 27 सप्टेंबर रोजी समर्पित करण्यात आला आहे.
श्री गजानन महाराज संस्थान (Shri Gajanan Maharaj Sansthan) (पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ए-250 बुलढाणा) या न्यासाच्या वतीने 27 सप्टेंबर 2026 रोजी 1 कोटी 11 लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला.
यंदाच्या मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पिण्याचा पाणीप्रश्न आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. श्री गजानन महाराज संस्थान (Shri Gajanan Maharaj Sansthan) हे केवळ धार्मिक श्रद्धास्थान नसून सामाजिक उत्तरदायित्व जपणारी अग्रगण्य संस्था आहे. यापूर्वीही राज्यावर आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या वेळी संस्थानने नेहमीच मदतकार्यात योगदान दिले आहे.
याच परंपरेला जागून राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आणि शासकीय पातळीवरील मदतकार्याला गती देण्यासाठी (Shri Gajanan Maharaj Sansthan) श्री संस्थानने तात्काळ मदतीचा निर्णय घेतला. संस्थानच्या या योगदानामुळे दुष्काळग्रस्त भागात मदतकार्य पोहोचवण्यास मोठी मदत होणार असून, श्री संस्थानच्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.