​श्री मुंगसाजी महाराज पतसंस्था

​श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Shri Mungsaji Maharaj Credit Society: सहकार क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय आणि विश्वासार्ह कार्याचा ठसा उमटवत, संपूर्ण जिल्हाभरात नावलौकिक मिळविणाऱ्या तसेच सलग चार वर्षांपासून दीपस्तंभ पुरस्कार

​श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Shri Mungsaji Maharaj Credit Society

२९५ कोटींच्या ठेवींसह संस्थेची दमदार प्रगती;
बदलत्या काळानुसार आधुनिक बँकिंग सुविधा देत संस्थेची गरुडझेप: राहूल बोंद्रे

​चिखली (Shri Mungsaji Maharaj Credit Society) : सहकार क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय आणि विश्वासार्ह कार्याचा ठसा उमटवत, संपूर्ण जिल्हाभरात नावलौकिक मिळविणाऱ्या तसेच सलग चार वर्षांपासून दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित होत असलेल्या श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व मान्यवरांच्या मोठ्या उपस्थितीत २१ सप्टेंबर रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली.
 
​संस्थेमध्ये ठेवीची सातत्यपूर्ण होणारी वाढ, ठेवीदारांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा विश्वास, कर्जदारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, काटेकोर आर्थिक नियोजन तसेच समाजाप्रती असलेली बांधिलकी या सर्व बाबींचे दर्शन सभेतील उत्स्फूर्त उपस्थितीतून घडून आले. संस्थेच्या २३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेताना सभासदांमध्येही समाधानाचे वातावरण दिसून आले.  

​कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे आराध्य दैवत श्री मुंगसाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून सभेची मंगलमय सुरुवात करण्यात आली.  
​आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत मध्ये मा. आ. राहुलभाऊ बोंद्रे, पंडितराव देशमुख नगर अध्यक्ष चिखली, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान सुपेकर, इश्वरराव इंगळे सभापती खरेदी विक्री संघ, शंकरदादा शिगणे सभापती दे.राजा, रियाजभाई माजी सभापती जि.प. आशिषजी लढढा, डॉ. यादव, कुणाल बोंद्रे, संजय गाडेकर, निलेश अंजनकर उपस्थित होते.  

​यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्षदीपकभाऊ देशमाने यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा सविस्तर आढावा सभासदांसमोर मांडला. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा पारदर्शकपणे अहवाल सभासदांना समजावून सांगणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षाच्या तुलनेत संस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल ५२ कोटी रुपयांची वाढ झाली असून, आजअखेर संस्थेकडे सुमारे २९० कोटी रुपयांच्या ठेवी जमा असल्याची माहिती त्यांनी दिली. संस्थेचे कर्जवाटपही १७० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले असून, संस्थेची आर्थिक वाटचाल सातत्याने गतिमान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

​सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानत संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या सहकार्यामुळेच संस्थेने प्रगतीचा हा टप्पा गाठला असल्याचे सांगत, संस्थेच्या वाढत्या आर्थिक आलेखातून तिच्या कार्यक्षम व्यवस्थापनाची प्रचीती येत असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या संचालक मंडळाचे काटेकोर नियंत्रण, कर्जवाटपातील नियोजनबद्धता आणि कर्जवसुलीकडे दिले जाणारे विशेष लक्ष यामुळे संस्थेचा कारभार दिवसेंदिवस विस्तारत असल्याचे राहुलभाऊ बोंद्रे यांनी सांगितले.  

सहकार क्षेत्रामध्ये विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि ग्राहक यांच्या विश्वासावरच संस्थेची खरी ताकद उभी राहत असते. हा विश्वास जपण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने सातत्याने प्रयत्न केले असून, त्याचे सकारात्मक परिणाम संस्थेच्या प्रगतीतून दिसून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. संस्थेची मालमत्ता व आर्थिक पाया मजबूत असून, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी संस्थेची स्वमालकीची इमारत तसेच MIDC चिखली येथे आधुनिक दर्जाचे गोडाऊन असल्याचे त्यांनी नमूद केले. सहकाराच्या माध्यमातून चिखली शहराच्या आर्थिक आणि व्यावसायिक विकासाला चालना देण्यात संस्थेचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थेने आपल्या आर्थिक कार्यासोबतच सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे संस्थेने नागरिकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले असून, भविष्यात संस्था राज्यभर आपला ठसा उमटवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

​पुढे बोलतांना संस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने यांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य फेडरेशनच्या वतीने देण्यात येणार्या दीपस्तंभ पुरस्काराने सलग चार वेळा संस्थेला गौरविण्यात आले आहे. हा सन्मान संस्थेच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याचे दीपकभाऊ देशमाने यांनी सांगितले.  

​राज्य फेडरेशनमार्फत विभागीय स्तरावर सलग तीन वेळा सन्मानित होणारी संस्था म्हणूनही आपली ओळख निर्माण होत असल्याचे सांगत, आगामी काळातही संस्थेला विविध नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ​संस्थेच्या वाढत्या व्यवहारांविषयी माहिती देताना दीपकभाऊ देशमाने म्हणाले की, चिखली शहरातील पतसंस्थांना सहकार क्षेत्रात जिल्ह्यासह महाराष्ट्रात वेगळा नावलौकिक मिळाला असून, त्यामध्ये श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. संस्थेमार्फत दररोज RTGS, NEFT तसेच ऑनलाइन माध्यमातून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार होत असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या आर्थिक व्यवस्थेचा स्वीकार करून सभासद आणि ग्राहकांना अधिकाधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

​संस्थेच्या मुख्यालयासह सर्व १७ शाखांचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, ग्राहकांना अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. पेपरलेस बँकिंगला प्रोत्साहन देतानाच शहरी सहकारी बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.   ​ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संस्थेच्या सर्व शाखांमध्ये वीज बिल भरणा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन व्यवहार, RTGS, NEFT, डिमांड ड्राफ्ट आदी आधुनिक सुविधा सर्व शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.  

​संस्थेने महिला सक्षमीकरणालाही विशेष प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक महिला बचत गटांना कर्जवाटप करून महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योग-व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल केली असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.  
​संस्थेच्या १७ शाखा जिल्ह्यात प्रभावीपणे कार्यरत असून, भविष्यात संस्थेचे कार्यक्षेत्र राज्यभर विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी काळात शाखाविस्तारासोबतच संस्थेच्या सेवा अधिक व्यापक स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. केवळ आर्थिक व्यवहार आणि नफ्यापुरते संस्थेचे कार्य मर्यादित नसून, समाजाप्रती असलेली बांधिलकी संस्थेने सातत्याने जपली असल्याचेही सभेत अधोरेखित करण्यात आले. वंचित, अनाथ, गरजू तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला आहे. संस्थेच्या विविध शाखांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य तपासणी उपक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत यांसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगण्यात आले.
 
​संस्थेच्या २३ वर्षांच्या प्रवासात आर्थिक विकासासोबत सामाजिक दायित्वही जपण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला असून, सहकाराच्या माध्यमातून चिखली शहर आणि परिसराच्या विकासात संस्थेचे योगदान राहिले असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.  यावेळी अशोकराव पडघाण यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले. संस्थेने स्वतःच्या विकासासोबतच सहसंस्थांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीलाही हातभार लावला असून, आज सुमारे ३०० लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.  

​श्री रामभाऊ झोरे यांनी आपल्या मनोगतात ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवणे, त्याची योग्य प्रकारे वाढ करणे आणि सभासदांचा विश्वास कायम राखणे या तीनही बाबींना संस्थेने महत्त्व दिले आहे. संस्थेची ही विश्वासार्हता आणि आर्थिक शिस्त भविष्यात संस्थेला आणखी मोठ्या प्रगतीकडे घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   ​चिखली शहराचे प्रथम नागरिक तथा श्रीराम नागरी सहकरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री पंडितराव देशमुख यांनी संस्थेप्रती आपले विचार व्यक्त करतांना संस्थेने २३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत चिखली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पुढे बोलतांना पतसंस्था चालविणे अत्यंत कसरतीचे काम असते मोठे नाव राजकीय वरदहस्त असतानाही जे काम साध्य होत नाही ते अगदी सहजपणे कोणालाही न दुखावता हे काम अत्यंत लिलयापणे संस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने अशा प्रकारे यांनी करून दाखविले आहे. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, ग्राहकाभिमुख सेवा, काटेकोर आर्थिक नियोजन, प्रभावी कर्जवसुली आणि सामाजिक बांधिलकी या आधारस्तंभांवर संस्थेची वाटचाल सुरू आहे.  

​चिखली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवत मुंगसाजी महाराज पतसंस्थेने विश्वास, पारदर्शकता आणि उत्कृष्ट ग्राहकसेवेच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीचे कौतुक करताना पतसंस्था चालविणे हे अत्यंत कसरतीचे आणि आव्हानात्मक काम आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये सातत्याने बदल होत असताना संस्थेचा कारभार शिस्तबद्ध पद्धतीने चालविणे, सभासदांचा आणि ठेवीदारांचा विश्वास कायम राखणे, कर्जदारांशी योग्य समन्वय साधणे तसेच संस्थेच्या आर्थिक हिताचे रक्षण करणे ही मोठी जबाबदारी असते. अशा परिस्थितीत श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेने गेल्या २३ वर्षांत केलेली प्रगती निश्चितच उल्लेखनीय आहे. पुढे बोलतांना, मोठे नाव, राजकीय वरदहस्त किंवा विविध प्रकारचे पाठबळ असूनही अनेक वेळा जी कामे साध्य होत नाहीत, ती कोणालाही न दुखावता, सर्वांना सोबत घेऊन आणि अत्यंत संयमाने पूर्ण करण्याची हातोटी संस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने यांनी दाखवून दिली आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांच्या नेतृत्वाची, दूरदृष्टीची आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. संस्थेच्या प्रत्येक निर्णयामध्ये सभासदांचे हित, ठेवीदारांचा विश्वास आणि संस्थेची आर्थिक शाश्वतता यांचा विचार केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
​पतसंस्थेने केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था म्हणून आपली ओळख मर्यादित न ठेवता ग्राहकांच्या गरजा आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपल्या कामकाजात सातत्याने नवनवीन बदल स्वीकारले आहेत. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ग्राहकाभिमुख सेवा, काटेकोर आर्थिक नियोजन, प्रभावी कर्जवसुली आणि सामाजिक बांधिलकी या संस्थेच्या यशस्वी वाटचालीतील प्रमुख आधारस्तंभ असल्याचे पंडितराव देशमुख यांनी सांगितले. आजच्या स्पर्धात्मक आर्थिक क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास संपादन करणे आणि तो दीर्घकाळ टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, सभासद व ग्राहकांशी सातत्याने सुसुंवाद ठेवून, त्यांच्या गरजा समजून घेत आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेमुळे संस्थेने आपले वेगळेपण जपले आहे. संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यामुळे व्यवहार अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक होण्यास मदत झाली आहे.  

​संस्थेच्या आर्थिक शिस्तीचाही विशेष उल्लेख करताना पंडितराव देशमुख यांनी सांगितले की, कोणत्याही सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य नियोजनासोबतच कर्जवितरण आणि कर्जवसुली यामध्ये समतोल राखणे आवश्यक असते. पतसंस्थेने या बाबींमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न करून संस्थेच्या आर्थिक प्रगतीला योग्य दिशा दिली आहे. आज संपन्न झालेल्या वार्षिक सभेमध्ये मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या शाखांना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक जानेफळ शाखा द्वितीय क्रमांक दे. मही शाखा आणि तृतीय क्रमांक दे. राजा शाखा यांना देण्यात आला.  

​आगामी काळात संस्थेचे कार्यक्षेत्र राज्यभर विस्तारण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून, नवीन शाखा, आधुनिक सेवा आणि ग्राहकांना अधिक सक्षम आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद असून, त्यांच्या सहकार्यामुळेच संस्थेने आजचा टप्पा गाठला आहे. भविष्यातही हा विश्वास कायम ठेवत सहकार क्षेत्रात नवनवे आदर्श निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.  
 २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला लाभलेली अभूतपूर्व उपस्थिती ही संस्थेवरील सभासदांचा वाढता विश्वास आणि संस्थेच्या पारदर्शक व गतिमान कारभाराची पावती असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.  

​आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने विष्णू पाटील कुळसुंदर माजी सभापती, अशोकराव पडघान, डॉ. इसरार, रफिक सेठ, श्रीरामभाऊ झोरे, सुनील जगताप, रामभाऊ जाधव, विलास घोलप, दीपक खरात नगर सेवक, अमोल लहाने, राम बनसोडे नगर सेवक, सचिन बोंद्रे, राजू जावळे, मनोज लाहुडकर, बाळासाहेब गावंडे, ज्ञानेश्वर सुरुशे माजी सभापती, प्रदीप हाके, आत्माराम देशमाने, वर्धमान डहाळे, पंढरीनाथ टेकाळे, प्रकाश सपकाळ, शिवनारायण म्हस्के, रवी तोडकर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी, कॉंग्रेस नेते शिवराज पाटील, गोविंदराव झोरेमाजी नगराध्यक्ष, संजय शिगणे खडकपूर्णा अर्बन अध्यक्ष, विजय खरात अध्यक्ष माळी महासंघ, शेषराव पाटील अमीन सेठ संस्थेचे उपाध्यक्ष मुरलीसेठ अग्रवाल संचालक पुंडलिक बापू राऊत, कन्हैयासेठ भोजवानी, विजय जागृत, आनंदभाऊ बोंद्रे, अभयजी तायडे, दिलीपभाऊ चवरे, खालीदखॉ उस्मानखॉ, गणेशभाऊ देशमाने, प्रकाशभाऊ निकाळजे, चंद्रकांत सुरडकर सर, सर्व शाखांचे सल्लागार, संस्थेचे सरव्यवस्थापक व्ही एन ठेंग, सर्व शाखा व्यवस्थापक कर्मचारी तसेच परिसरातील व शाखा परीसरातील संस्थेवर प्रेम करणारे सामान्य नागरिक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

​कार्यक्रामाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक चंद्रकांत सुरडकर अहवाल वाचन संस्थेचे सरव्यवस्थापक व्ही एन ठेंग यांनी तर आभार प्रदर्शन संचालक आनंद बोंद्रे यांनी केले.  
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश जोशी, यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.