Siddhivinayak Temple

सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळ्याची चौकशी वेगात; एकनाथ शिंदेंकडून पाच वर्षांच्या देणग्यांच्या विशेष ऑडिटचे आदेश

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील  देणगी घोटाळा प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळ्याची चौकशी वेगात; एकनाथ शिंदेंकडून पाच वर्षांच्या देणग्यांच्या विशेष ऑडिटचे आदेश

Siddhivinayak Temple

रोख देणग्या, दागिने आणि मौल्यवान वस्तूंची होणार सखोल पडताळणी; अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाईचे संकेत

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील  देणगी घोटाळा प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या पाच वर्षांमध्ये जमा झालेल्या रोख देणग्या, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेद्वारे मंदिरातील आर्थिक व्यवहार, देणग्यांची नोंद तसेच मौल्यवान वस्तूंच्या व्यवस्थापनाची सखोल छाननी केली जाणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विशेष लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तपासात कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

या घडामोडीपूर्वी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी ४ ऑगस्ट रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. जवळपास २० मिनिटे झालेल्या चर्चेनंतर या प्रकरणाच्या चौकशीबाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना विशेष लेखापरीक्षणाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, मंदिरातील मागील पाच वर्षांतील आर्थिक व्यवहार, प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा तपशीलवार आढावा घेतला जाणार असून, त्याबाबतचा अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

या ऑडिटमध्ये मंदिरात गेल्या पाच वर्षांत किती रोख देणगी जमा झाली, किती मौल्यवान दागिने व इतर वस्तू देणगी स्वरूपात प्राप्त झाल्या, तसेच त्यांचे व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहार नियमानुसार झाले का, याची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, या कालावधीत कोणतीही आर्थिक अनियमितता किंवा अपहार झाला आहे का आणि करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याचाही सखोल शोध घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026