सिंहगड किल्ल्यावर हृदयद्रावक घटना; शोधमोहीम संपली दु:खद शेवटाने

पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ला परिसरातून बेपत्ता झालेल्या २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह दीर्घ प्रतीक्षेनंतर खोल दरीत आढळून आला आहे.

सिंहगड किल्ल्यावर हृदयद्रावक घटना; शोधमोहीम संपली दु:खद शेवटाने

Sinhagad Fort Incident

धायरी (Sinhagad Fort Incident) : पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ला परिसरातून बेपत्ता झालेल्या २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह दीर्घ प्रतीक्षेनंतर खोल दरीत आढळून आला आहे. सलग दोन दिवसांच्या मोहिमेनंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाने कठीण परिस्थितीत रॅपलिंग करून दरीतून मृतदेह बाहेर आणला. या घटनेमुळे संपूर्ण सिंहगड परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणीचे नाव मनीषा धर्मदास गायकवाड (वय २८) असे असून ती मूळची नांदेड जिल्ह्यातील धेनेगाव येथील रहिवासी होती. सध्या ती चिंचवडमधील बिजलीनगर परिसरात वास्तव्यास होती. तिने बीई इलेक्ट्रिकलचे शिक्षण पूर्ण केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी मनीषा सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, किल्ला परिसरात तिची बॅग, मोबाईल आणि इतर वैयक्तिक साहित्य आढळून आले. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने हवेली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता परिसरातील काही स्थानिक नागरिकांनी सायंकाळच्या सुमारास दरीत कुणीतरी पडल्याचा आवाज ऐकला असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली.

हवेली पोलीस, सिंहगड वनविभाग, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू करण्यात आले. दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि खोल दरीमुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले होते. सलग दोन दिवस अथक प्रयत्न सुरू राहिले.

अखेर आपत्ती व्यवस्थापन पथकाला खोल दरीत मनीषाचा मृतदेह आढळून आला. दोराच्या सहाय्याने रॅपलिंग करत अत्यंत धोकादायक परिस्थितीत पथकाने मृतदेह बाहेर काढला आणि पुढील कार्यवाहीसाठी तो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

प्राथमिक तपासात असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, मनीषाने किल्ल्याच्या बुरुजावरून दरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी. मात्र, तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणाचा सखोल तपास हवेली पोलीस करत असून, तिच्या मानसिक स्थितीपासून ते घटनास्थळावरील सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. दरम्यान, या घटनेने सिंहगड परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी या दुर्दैवी घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुण्यातील ९० कोटींच्या वेलस्ली रस्ता निविदेवरून वाद; आमदाराने आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप, तर अधिकाऱ्यांनाही हक्कभंगाची दमबाजी.

Sep 29, 2026
नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घरात पहाटे तरुणाची घुसखोरी. बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि 10 मीटर दोरी सापडल्याने तपासाला वेग.

Sep 28, 2026
अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला ‘मफलर’ नेत्याचा पर्दाफाश करण्याची घोषणा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला ‘मफलर’ नेत्याचा पर्दाफाश करण्याची घोषणा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला VSR कंपनी आणि ‘मफलर’ नेत्याबाबत पुरावे मांडणार.

Sep 28, 2026