पातूर मुसळधार पाऊस

मुसळधार पावसात सोलर यंत्रणा कोलमडली; डोणगाव-आलेगाव रस्त्यावरील खांब कोसळले शेतात

Patur Heavy Rain: परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे डोणगाव-आलेगाव रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या शासकीय सौरऊर्जा (सोलर) योजनेतील काही खांब कोसळून शेतात पडल्याची घटना

मुसळधार पावसात सोलर यंत्रणा कोलमडली; डोणगाव-आलेगाव रस्त्यावरील खांब कोसळले शेतात

Patur Heavy Rain

पातूर (Patur Heavy Rain) : परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे डोणगाव-आलेगाव रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या शासकीय सौरऊर्जा (सोलर) योजनेतील काही खांब कोसळून शेतात पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे तसेच १०० हून अधिक झाडांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

घटनेनंतर ग्रामस्थांनी सोलर योजनेतील कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले खांब योग्य पद्धतीने रोवले गेले नसून काही ठिकाणी आधारासाठी झाडांना बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोसळलेल्या खांबांच्या पायाभूत कामावरून निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत संपूर्ण पातूर तालुक्यातील सोलर प्रकल्पांची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. शासनाच्या मंजूर अंदाजपत्रकानुसार काम झाले की नाही, याची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसानंतर आलेगाव व परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला असून अनेक भागात दीर्घकाळ अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने महावितरणच्या देखभाल व दुरुस्ती व्यवस्थेवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Patur Heavy Rain) वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याबरोबरच त्यामागील तांत्रिक कारणांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठेकेदार, अधिकारी किंवा इतर संबंधितांवरील भ्रष्टाचार व संगनमताचे आरोप हे स्थानिक नागरिकांनी केलेले आरोप आहेत. याबाबत संबंधित विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

संबंधित सामग्री

पातूर नगर परिषद निवडणुकीत शिक्षकां चा सहभागाची चकौशी करा: हिदायतखान

पातूर नगर परिषद निवडणुकीत शिक्षकां चा सहभागाची चकौशी करा: हिदायतखान

Patur Municipal Council Election: पातूर नगर परिषद निवडणुकीत काही शासकीय व अनुदानित शाळांतील शिक्षकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी

Jun 24, 2026