सोनपेठ तहसीलदार लाचखोरी

परभणीत बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सोनपेठचे तत्कालीन तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

Sonpeth Tehsildar Bribery Case: सोनपेठचे तत्कालीन तहसीलदार तथा सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले लोकसेवक आशिषकुमार बापूराव बिरादार

परभणीत बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सोनपेठचे तत्कालीन तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

Sonpeth Tehsildar Bribery Case

 

८७ लाख ८४ हजार २८८ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता; परभणी एसीबीची कारवाई

परभणी (Sonpeth Tehsildar Bribery Case) : सोनपेठचे तत्कालीन तहसीलदार तथा सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले लोकसेवक आशिषकुमार बापूराव बिरादार यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत तब्बल ८७ लाख ८४ हजार २८८ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ही मालमत्ता ८१.९१ टक्के अधिक असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.ही कारवाई मंगळवार १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:४५ वाजेच्या दरम्यान   लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली.

या (Sonpeth Tehsildar Bribery Case) प्रकरणी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आशिषकुमार बिरादार तसेच त्यांच्या पत्नी अपर्णा आशिषकुमार बिरादार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. बिरादार यांच्याविरुद्ध यापूर्वीच्या तक्रारीवरून सोनपेठ पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिरादार यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर ३ डिसेंबर २००९ ते ३ ऑगस्ट २०२२ या कालावधीतील त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाचा आणि संपत्तीचा तपशील तपासण्यात आला.

या (Sonpeth Tehsildar Bribery Case) चौकशीत उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ८७ लाख ८४ हजार २८८ रुपयांची अधिक संपत्ती आढळून आली. तसेच, बिरादार यांच्या पत्नी अपर्णा बिरादार यांनी काही मालमत्ता स्वत:च्या नावे संपादित करून पतीला मदत व प्रोत्साहन दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अल्ताफ मुलाणी करीत आहेत. ही कारवाई लाप्रवी पोलिस अधिक्षक नांदेड श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.अल्ताफ मुलाणी, पोलीस उपअधिक्षक महेश पाटणकर, किशोर तोरणे यांनी केली.