शिक्षण व वसतिगृह शुल्क विशेष सवलत

दुष्काळसदृश परिस्थितीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा;  मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Tuition and Hostel Fees: पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करून शिक्षण व वसतिगृह शुल्कात विशेष सवलत देण्यात यावी

दुष्काळसदृश परिस्थितीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा;  मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Tuition and Hostel Fees

 

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन;
शिक्षण व वसतिगृह शुल्कात विशेष सवलतीची मागणी

अकोला/पातुर (Tuition and Hostel Fees) : पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करून शिक्षण व वसतिगृह शुल्कात विशेष सवलत देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रा. मो. फरहान अमीन,  समाजसेवक तथा पत्रकार नातिक शेख यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावीदुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च पालकांसाठी मोठे आर्थिक ओझे ठरत आहे. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शासनाने तातडीने विशेष आर्थिक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

टैग्स: Tuition and Hostel Fees