वादळी पाऊस अपघात

परभणीत वादळी वाऱ्यासह पावसाने पाच वाहने पडली; पिकअप चालक गंभीर जखमी...!

Stormy Rain Accident: जिंतूर-परभणी मार्गावरील नादपूर रस्त्यावर गुरुवारी (दि. ४ जून) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने मोठा कहर केला.

परभणीत वादळी वाऱ्यासह पावसाने पाच वाहने पडली; पिकअप चालक गंभीर जखमी...!

Stormy Rain Accident

परभणी (Stormy Rain Accident) : जिंतूर-परभणी मार्गावरील नादपूर रस्त्यावर गुरुवारी (दि. ४ जून) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने मोठा कहर केला. या वादळामुळे एक मालवाहतूक करणारे महिंद्रा पिकअप वाहन व चार दुचाकी वाहने रस्त्यालगत पडून नुकसानग्रस्त झाली. या दुर्घटनेत पिकअप वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात अचानक वेगाने वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर झालेल्या (Stormy Rain Accident) मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे महिंद्रा पिकअप वाहनाचा ताबा सुटून ते रस्त्यालगत कोसळले. तसेच जवळ उभ्या असलेल्या चार दुचाकी वाहनांनाही वाऱ्याचा फटका बसल्याने ती पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अपघातात पिकअप वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Stormy Rain Accident) वादळी पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, हवामानातील अचानक बदलामुळे नागरिकांनी व वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच स्थानिक नागरिकांनीही वादळी वाऱ्याच्या काळात सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे व अनावश्यक प्रवास टाळण्याचे प्रयत्न करावे.

टैग्स: Stormy Rain Accident