हिंगोली (Superintendent of Police Shrenik Lodha) : शहरातील मारवाडी गल्ली भागात ५ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास घरामधील फटाक्यांच्या गोदामाला आग लागून स्फोट झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असुन १२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या निमित्ताने ७ ऑक्टोंबर रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी जळीतग्रस्त ठिकाणी भेट देऊन घटना स्थळाची पाहणी केली.
हिंगोली शहरामध्ये ५ ऑक्टोंबरला बासटवार यांच्या निवासस्थानातील फटाक्याच्या गोदामाला आग लागून घटनास्थळी दोघांचा मृत्यू झाला. तर रूग्णालयात उपचारा दरम्यान अग्निशमन दलातील कर्मचार्याचा मृत्यू झाला. या मृत्यूचा आकडा तीन वर पोहचला आहे. या घटनेमध्ये १२ जण जखमी झाले असुन त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर, लातूर व हिंगोलीतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या निमित्ताने पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी ७ ऑक्टोंबर बुधवार रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास जळीतग्रस्त ठिकाणी भेट दिली. ज्याठिकाणी फटाक्यांचा गोदाम होता अशा बासटवार यांच्या निवासस्थानासह शैलेश नांदेडकर यांच्या संगित साधना विद्यालय ठिकाणी देखील भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेतली. या प्रसंगी त्यांच्या सोबत उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, संजय तोडेवाले, उमेश जाधव, शेख अमजद यांची उपस्थिती होती.
पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा
जळीतग्रस्त ठिकाणी पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा केली पाहणी
Superintendent of Police Shrenik Lodha:
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Superintendent of Police Shrenik Lodha