तक्षशिला महाविद्यालय विद्यार्थी

२५ वर्षांनी पुन्हा भेटले तक्षशिला महाविद्यालयाचे मित्र; आठवणींनी डोळ्यांच्या कडा ओलावल्या

Takshashila College Student: काळ पुढे सरकत गेला. शिक्षण पूर्ण झाले. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात, नोकरीत, व्यवसायात आणि संसारात रमला. पण महाविद्यालयीन जीवनातील मैत्री मात्र मनाच्या एका कोपऱ्यात

२५ वर्षांनी पुन्हा भेटले तक्षशिला महाविद्यालयाचे मित्र; आठवणींनी डोळ्यांच्या कडा ओलावल्या

Takshashila College Student

 

जुन्या आठवणींना उजाळा देत समाजसेवेचा संकल्प

अमरावती (Takshashila College Student) : काळ पुढे सरकत गेला. शिक्षण पूर्ण झाले. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात, नोकरीत, व्यवसायात आणि संसारात रमला. पण महाविद्यालयीन जीवनातील मैत्री मात्र मनाच्या एका कोपऱ्यात तशीच जपली गेली. तब्बल २५ वर्षांनंतर तक्षशिला महाविद्यालयाच्या २००१-०२ बॅचचे माजी विद्यार्थी रविवार (ता.13) रोजी वलगाव रोड स्थित आनंद बाग लॉनमध्ये  पुन्हा रावसाहेब वानखडे यांच्या नेतृत्वात  एकत्र आले. आणि जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.

कधीकाळी एकाच बाकावर बसणारे, एकत्र अभ्यास करणारे, (Takshashila College Student) महाविद्यालयाच्या कट्ट्यावर गप्पा मारणारे आणि सुख-दुःख वाटून घेणारे मित्र तब्बल अडीच दशकानंतर पुन्हा समोरासमोर आले. काळाने प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक बदल घडवले असले तरी मैत्रीचा धागा मात्र तुटला नव्हता, हे या भेटीतून प्रकर्षाने जाणवले.

या (Takshashila College Student) स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणी, महाविद्यालयीन जीवनातील किस्से, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्या काळातील अनुभवांना उजाळा देण्यात आला. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आपुलकीचा भाव या भेटीचे विशेष आकर्षण ठरले.या भेटीला केवळ आठवणींचा मेळावा न ठेवता समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करण्यात आला. आपण समाजाकडून खूप काही घेतले आहे. आता समाजाला काहीतरी देणे लागते, या भावनेतून सर्व मित्रांनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचा मानस व्यक्त केला.

 स्नेह सोहळ्याला (Takshashila College Student) डॉ. राजेश बोबडे, सुनील चौधरी, दिपक शिरसाट, नरेंद्र तायडे, प्रविण बर्वे  रावसाहेब वानखडे, मंगेश भांबुरकर, प्रफुल्ल शिंगणापुरे, भारत अवचार, प्रवीण हनवते,  प्रविण चिंचखेडे, गौतम मेश्राम, नयन मोंढे, दिगंबर तायडे,  सदानंद गुडधे, शेख फईम   अजय रामटेके यांच्यासह बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी ची नवी दिशा देण्याचा निर्धार 

२५ वर्षांनी पुन्हा भेटलेले मित्र केवळ जुन्या आठवणी घेऊन परतले नाहीत, तर मैत्रीला सामाजिक बांधिलकीची नवी दिशा देण्याचा निर्धार घेऊन परतले. काळाच्या ओघात केस पांढरे झाले, चेहरे बदलले, जबाबदाऱ्या वाढल्या मात्र मनात जपलेली मैत्री आजही तितकीच तरुण आहे, याची सुंदर अनुभूती या स्नेहमेळाव्याने दिली.