तळप अन्नत्याग आंदोलन

तळप बु. येथील युवकांचा अन्नत्याग बेमुदत आंदोलन  सुरूच!

Talap Annyatyag Andolan: मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तळप बु येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध विकास कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी..

तळप बु. येथील युवकांचा अन्नत्याग बेमुदत आंदोलन  सुरूच!

Talap Annyatyag Andolan

मानोरा (Talap Annyatyag Andolan) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तळप बु येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध विकास कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी  दि. २८ सप्टेंबर रोजी सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयात सुरू झालेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन सलग तिसऱ्याही दिवशी सुरूच होते. प्रस्तुत प्रतिनिधीने आंदोलनाला भेट दिली असता आंदोलनकर्त्यांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. 

गट विकास अधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, सन २०२१-२२ मध्ये १५ व्या वित्त आयोगातून २ लाख ९९ हजार रुपये आरओ प्लांट साठी मंजूर झाले. मात्र अद्याप आरओ प्लांट बसविण्यात आले नाही, परंतु हा निधी खर्च केला आहे.  तसेच क्रीडांगणासाठी आलेला निधी खर्च करून काम निकृष्ट करण्यात आले, दिव्यांगासाठी पाच टक्के निधी खर्च करण्यात आला नाही, दलीत वस्ती मधील रस्ता काम निकृष्ट करण्यात आले. यासह सर्व कामाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा व भ्रष्ट्राचार करणाऱ्या  संबंधित ग्राम विकास अधिकारी यांच्याकडून शासनाची रक्कम वसूल करून कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी बंडू इंगोले, अनिल गायकवाड, सदानंद इंगोले, पवन वानखडे आदींनी सोमवारपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी अन्यथा आंदोलन सुरूच असुन ग्रामस्थ आंदोलन स्थळाला भेट देऊन जाहीर पाठींबा आहे.

या (Talap Annyatyag Andolan) आंदोलनाला गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांनी भेट देऊन येत्या १५ दिवसात निःपक्ष चौकशी करून जोशी विरुद्ध कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, परंतु आंदोलन कर्ता युवकांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार व्यक्त केला आहे. 

टैग्स: Talap Annyatyag Andolan