Tanda Vasti Development Scheme

तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी रखडला; जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातही उपेक्षेचा आरोप

‘संत सेवालाल महाराज बंजारा/तांडा समृद्धी योजने’लाही निधी उपलब्ध होत नसल्याने वाशिम जिल्ह्यातील विकासकामे रखडल्याचा आरोप पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. छाया राठोड यांनी केला आहे.

तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी रखडला; जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातही उपेक्षेचा आरोप

Tanda Vasti Development Scheme

वाशिम जिल्ह्यातील तांडा, वाडी-वस्त्यांमधील विकासकामे रखडल्याचा माजी पंचायत समिती सदस्या छाया राठोड यांचा दावा

मानोरा : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेनंतर बंजारा तांडा-वस्त्यांच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘संत सेवालाल महाराज बंजारा/तांडा समृद्धी योजने’लाही निधी उपलब्ध होत नसल्याने वाशिम जिल्ह्यातील विकासकामे रखडल्याचा आरोप पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. छाया राठोड यांनी केला आहे.

तांडा, वाडी आणि वस्त्यांमध्ये आजही विविध मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे. अशा परिस्थितीत दि. १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या डीपीडीसी (जिल्हा नियोजन समिती) बैठकीच्या आराखड्यातही वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना तसेच संत सेवालाल महाराज बंजारा/तांडा समृद्धी योजनेचा अपेक्षित समावेश व निधीची तरतूद झालेली नसल्याने या वस्त्यांची उपेक्षा होत असल्याचा आरोप छाया राठोड यांनी केला आहे.

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासनाकडून तांड्यांमधील मूलभूत विकासकामांसाठी निधी दिला जात होता. रस्ते, नाली आणि वीज यांसारख्या सुविधांसाठी संबंधित तांड्याच्या लोकसंख्येच्या आधारे विकास निधी मंजूर केला जात असे. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडून संबंधित कामांना मंजुरी देण्यात येत होती.

सुरुवातीच्या काळात ही योजना सुरळीतपणे राबवली जात होती. मात्र, मागील पाच वर्षांपासून ही योजना जणू विजनवासात गेल्याचे चित्र असून विकासकामे प्रत्यक्षात होण्याऐवजी केवळ कागदोपत्रीच दाखवली जात असल्याचा आरोप छाया राठोड यांनी केला आहे.

बंजारा तांडा-वस्त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी महायुती सरकारच्या वतीने ‘संत सेवालाल महाराज बंजारा/तांडा समृद्धी योजना’ सुरू करण्यात आली. मात्र, वाशिम जिल्ह्यातील तांड्यांमध्ये या योजनेअंतर्गत अपेक्षित स्वरूपाची ठोस विकासकामे झालेली नसल्याचे राठोड यांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून योजनेसाठी निधीच उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याने ही योजनाही प्रत्यक्षात कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

तांडा वस्त्यांमधील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेला भरघोस निधी देऊन तांडा, वाडी आणि वस्त्यांमधील भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना घरकुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली होती. याबाबत तत्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तसेच हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत लक्षवेधी प्रश्नही उपस्थित करण्यात आला. मात्र, अद्याप यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे छाया राठोड यांनी सांगितले.

त्यामुळे आता तरी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात तांडा-वस्त्यांच्या विकासासाठी तातडीने निधीची तरतूद करावी, अशी मागणी पुढे आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ तांडा-वस्त्यांमधील नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचेही राठोड यांनी नमूद केले.

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतील निधी, मंजूर विकासकामे आणि प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही मदतीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही मदतीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांसाठी अन्य निकषांवर मदतीचा प्रस्ताव; पाणीवापर आणि दहावी-बारावी परीक्षा शुल्काबाबतही फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश.

Sep 29, 2026

दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

Manora Drought declared: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने काढलेला दुष्काळी शासन निर्णय 'कोरड्या दुष्काळाचा कोरडा जीआर' आहे. दुष्काळी उपाययोजना

Sep 28, 2026
तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

Manora Tehsil Office: मानोरा शहरातील गजबजलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा भटक्या श्वानांचा मुक्त वावर वाढला असून, कामकाजाच्या वेळेतच या कुत्र्यांनी सरकारी कार्यालयात..

Sep 27, 2026