Telangana Forest Department

तेलंगणा वनविभागाकडून महाराष्ट्राच्या सीमाभागातील शेतकऱ्यांच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील संगणापूर येथे तेलंगणा वनविभागाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पिकांची नासधूस केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.<br/>

तेलंगणा वनविभागाकडून महाराष्ट्राच्या सीमाभागातील शेतकऱ्यांच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

Telangana Forest Department

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील संगणापूर गावातील घटना

जिवती (चंद्रपूर) : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील संगणापूर गावात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर तेलंगणा राज्याच्या वनविभागाकडून ट्रॅक्टर फिरवून पिकांची नासधूस करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात तेलंगणा राज्याच्या वनविभाग व पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर फिरवून उभे पीक उद्ध्वस्त केल्याचे दिसत आहे.

विश्वसनीय माहितीनुसार, संबंधित जमिनीवर वृक्षलागवड करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. तरीही या घटनेमुळे सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अशा प्रकारची कारवाई झाल्याचा दावा अत्यंत गंभीर मानला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय व भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक स्तरावर जोर धरत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत तेलंगणा वनविभाग, पोलीस प्रशासन किंवा संबंधित जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका आणि प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुण्यातील ९० कोटींच्या वेलस्ली रस्ता निविदेवरून वाद; आमदाराने आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप, तर अधिकाऱ्यांनाही हक्कभंगाची दमबाजी.

Sep 29, 2026
२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल, ‘सरसकट मदत कुठे?’

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल, ‘सरसकट मदत कुठे?’

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवारांनी हेक्टरी एक लाख मदत आणि कर्जमाफीची मागणी करत सरकारवर टीका केली.

Sep 26, 2026
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ जणांना १.४४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ जणांना १.४४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून चंद्रपुरातील ११ जणांकडून १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप.

Sep 26, 2026
गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल. रेल्वे स्थानकातील CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.

Sep 26, 2026