परभणी तालुक्यातील नरसापूर शेत शिवारातील घटना ग्रामीण पोलिसात नोंद...!
परभणी (Tractor driver Death) : ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना ७ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास परभणी तालुक्यातील नरसापूर शेत शिवारात गट क्रमांक १०८ मध्ये घडली. या (Tractor driver Death) प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अच्युत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. बालासाहेब रामराव शिंदे, वय ४२ वर्ष, असे मयताचे नाव आहे.
फिर्यादी यांचे चुलत भाऊ बालासाहेब शिंदे हे ट्रॅक्टर घेऊन स्वत:च्या शेतामध्ये काम करत होते. (Tractor driver Death) अचानक त्यांचे ट्रॅक्टर शेतातील विहिरीत पडले. यामध्ये बालासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. स्वत:च्या ताब्यातील ट्रॅक्टर हयगयपणे व निष्काळजीपणे चालवून स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी संबंधितावर परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. गडदे करत आहेत.