तिकीट मशीन बंद पडल्याने एसटी तब्बल तासभर रस्त्यात उभी 

आधीच भंगार अवस्थेतील बसेस वारंवार रस्त्यात बंद पडत असताना आता तिकीट काढण्याची मशीन बंद पडल्याने चक्क एसटी बस तब्बल एक तास रस्त्यात उभी ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तिकीट मशीन बंद पडल्याने एसटी तब्बल तासभर रस्त्यात उभी 

Transport Mismanagement

प्रवाशांचा संताप; एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका

गडचिरोली (Transport Mismanagement) : आधीच भंगार अवस्थेतील बसेस वारंवार रस्त्यात बंद पडत असताना आता तिकीट काढण्याची मशीन बंद पडल्याने चक्क एसटी बस तब्बल एक तास रस्त्यात उभी ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी गडचिरोलीवरून खांबाडा येथे सकाळी साधारण ९ ते १० वाजताच्या दरम्यान जाणारी एसटी बस धानोरा तालुक्यातील ढवळी गावाजवळ अचानक थांबवण्यात आली. तिकीट काढण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन बंद पडल्याचे कारण देत बस तब्बल एक तास रस्त्यात उभी ठेवण्यात आली. यामुळे बसमधील कर्मचारी, रुग्ण तसेच इतर प्रवासी अडचणीत सापडले.

प्रवाशांनी चालक व वाहक यांच्याकडे बस का थांबवली याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देण्याऐवजी उद्धट व अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. “बस इथून सोडणार नाही, जायचं असेल तर जा नाहीतर जे बनतं ते करा,” अशा स्वरूपाची उत्तरे संबंधित कर्मचाऱ्यांकडून मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला.

तिकीट मशीन खराब होणे आणि बस सेवा थांबवणे यांचा थेट संबंध नसताना, एसटी प्रशासनाने मॅन्युअल तिकीट देण्याची पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र प्रवाशांना वेठीस धरून बस थांबवण्यात आल्याने हा प्रकार बेजबाबदार व अन्यायकारक असल्याची टीका प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर आजाद समाज पार्टीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांकडून तक्रार प्राप्त होताच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी तात्काळ आगार प्रमुखांशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संबंधित बस पुढे रवाना करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारे प्रवाशांना त्रास देणाऱ्या घटना पुन्हा घडल्यास आजाद समाज पार्टीच्या वतीने संबंधित एसटी डेपोवर तीव्र “हल्लाबोल आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

१ ऑक्टोबरपासून ST सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य होणार. महिला व ज्येष्ठ नागरिकांना QR पावती, BHIM App आणि OTPची सुविधाही मिळणार.

Sep 29, 2026
बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

Sep 26, 2026
एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

ST Bus Accidental Death: कांद्री परिसरातील नागपुर-जबलपुर महा मार्गावर पेट्रोल पंपासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना

Sep 20, 2026
‘देशोन्नती’च्या वृत्ताचा धसका! चिखली आगार व्यवस्थापकांचे विभागीय नियंत्रकांना पत्र

‘देशोन्नती’च्या वृत्ताचा धसका! चिखली आगार व्यवस्थापकांचे विभागीय नियंत्रकांना पत्र

‘देशोन्नती’च्या वृत्तानंतर चिखली आगार व्यवस्थापकांचे विभागीय नियंत्रकांना पत्र; बसस्थानक व आगारातील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी.

Sep 19, 2026
स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ एसटी बस पलटली.

Sep 18, 2026