Tree Plantation

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीत जयस्तंभ चौक ते खामगाव चौफुली मार्गावर सुरू असलेल्या वृक्षलागवडीची नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पाहणी करून वृक्षसंवर्धनाच्या सूचना दिल्या.

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

Tree Plantation

जयस्तंभ चौक ते खामगाव चौफुली मार्गावरील वृक्षलागवडीची नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केली पाहणी

चिखली : शहराच्या विकासाला आता पर्यावरण संवर्धनाचीही जोड देण्यात येत असून, ‘हरित चिखली, सुंदर चिखली, विकसित चिखली’ या संकल्पनेतून चिखली नगरपरिषदेने वृक्षलागवडीला गती दिली आहे. जयस्तंभ चौक ते खामगाव चौफुली या प्रमुख मार्गावर सुरू असलेल्या वृक्षलागवडीच्या कामाची नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी 16 सप्टेंबर 2026 रोजी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासकामांना गती देतानाच स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील प्रमुख मार्गावर वृक्षलागवड करण्यात येत आहे.

पाहणीदरम्यान नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी वृक्षांची निवड, शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड तसेच लागवडीनंतरच्या संगोपनाबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. लावलेली रोपे केवळ संख्या वाढविण्यापुरती मर्यादित न राहता त्यांचे योग्य संगोपन होणे आवश्यक आहे. प्रत्येक वृक्षाला नियमित पाणी, संरक्षण आणि आवश्यक देखभाल मिळावी, यासाठी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

‘आज लावलेले वृक्ष हे उद्याच्या चिखलीच्या हरित भविष्याची पायाभरणी आहेत,’ या भूमिकेतून नगरपरिषदेच्या माध्यमातून वृक्षलागवडीसोबतच त्यांच्या संवर्धनावरही विशेष लक्ष दिले जात आहे. शहराचा विकास करताना नागरिकांना स्वच्छ, सुंदर, हिरवेगार आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी पर्यावरणपूरक उपक्रमांना सातत्याने चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चिखलीच्या विकासाची दिशा केवळ भौतिक सुविधांच्या निर्मितीपुरती मर्यादित न ठेवता शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरणीय गुणवत्तेतही भर घालण्याची असल्याचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विकासकामांसोबत शहरातील हिरवाई वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

यावेळी नगरसेवक सागर पुरोहित, सामाजिक कार्यकर्ते राम बनसोडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव महेशभाऊ लोणकर, मुंढे साहेब, पाखरे साहेब यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026