डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नांदेडमध्ये आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या वतीने महामानवाला अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar: नांदेडमध्ये आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या वतीने महामानवाला अभिवादन

नांदेडमध्ये आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या वतीने महामानवाला अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar

​नांदेड (Dr. Babasaheb Ambedkar) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. 'जय भीम'च्या जयघोषाने आणि निळ्या पाखरांच्या मेळाव्याने संपूर्ण शहर भीममय झाले होते. या जयंती महोत्सवात आदिवासी मन्नेरवारलू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​जयंतीच्या दिनी मध्यरात्री ठीक १२ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच १४ एप्रिल रोजी दिवसभर समाज बांधवांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपली गेली. शहरात विविध ठिकाणी पाणी वाटप, खिचडी वाटप आणि फळ वाटपाचे कार्यक्रम राबवून जनसेवा करण्यात आली. सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतही आदिवासी मन्नेरवारलू समाज बांधवांनी आपला लक्षणीय सहभाग नोंदवला.

याप्रसंगी आदिवासी मन्नेरवारलू समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेशराव अंबुलगेकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, प्रसिद्ध उद्योजक मारोतराव कंठेवाड,मारोतीराव कलेटवाड देगलूरकर, सदाशिव चलनेवाड, अतुल पेदेवाड, सुनील टिप्परसे, श्याम बास्टेवाड, अविनाश अंबेराव, गिरीश भाटे,बळवंत बोधनकर, गिरीश गुरलेवाड,मधुकर उन्हाळे,व्यंकट गंदपवाड, दत्तात्रय अन्नमवाड,सुधिर राऊतवाड,पत्रकार पवन जगडमवार,शिवाजी गोपूलवाड,किरण पडलवार, शिवकुमार बैनवाड, अक्षय मुपडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टैग्स: Dr Babasaheb Ambedkar

संबंधित सामग्री

चाकूरकरांच्या स्मारकासह सर्व विषय बहुमताने मंजूर!

चाकूरकरांच्या स्मारकासह सर्व विषय बहुमताने मंजूर!

Shivraj Patil Chakurkar Memorial: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाच्या विषयासह विषय पत्रिकेवरील 28 विषय बहुमताने मंजुरी देत सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा विकास काम..

Aug 05, 2026
परभणीत अत्यावश्यक सुविधा वगळता गंगाखेड शहर कडकडीत बंद

परभणीत अत्यावश्यक सुविधा वगळता गंगाखेड शहर कडकडीत बंद

Gangakhed Shutdown: परभणीतील गंगाखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिल्लीतील लाठीच्या हल्ल्यालाच विरोध करण्यासाठी महारत बांधली. हे बंद शहरात व्यवसायिक व व्यापारी कडक प्रतिसाद

Jul 23, 2026
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

समता दिंडी, अभिवादन कार्यक्रम, विविध शासकीय योजनांचा लाभवाटप सोहळा तसेच नशामुक्तीची शपथ आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Jun 26, 2026
आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते भीमजयंतीनिमित्त अभिवादन; चिखलीत उत्साहपूर्ण वातावरण

आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते भीमजयंतीनिमित्त अभिवादन; चिखलीत उत्साहपूर्ण वातावरण

“राष्ट्र कोहिनूर भीमरायांना सहर्ष देऊ मानवंदना” या घोषवाक्याने चिखली शहरात भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Apr 14, 2026
ग्रामीण तरुणाची वैचारिक भरारी; पुरोगामी विचारांवर आधारित पुस्तकाचे लेखन

ग्रामीण तरुणाची वैचारिक भरारी; पुरोगामी विचारांवर आधारित पुस्तकाचे लेखन

तालुक्यातील हेटी या खेडेगावातील  एक मुलगा बि. ए. पदवीचे  शिक्षणासाठी वरोरा येथे गव्हर्मेंट  हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या या विद्यार्थ्याने परिवर्तनवादी अत्यंत पुरोगामी वैचारिक पुस्तक लिहिले आहे 

Apr 11, 2026