कुरखेडा नगरपंचायत मध्ये थकीत पगारासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन; मुख्याधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा

मागील दोन महिन्यांचा (फेब्रुवारी व मार्च २०२६) थकीत पगार न मिळाल्याने कुरखेडा नगरपंचायतातील सर्व सफाई कर्मचारी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

कुरखेडा नगरपंचायत मध्ये थकीत पगारासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन; मुख्याधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा

Unpaid Salaries Issue

कुरखेडा (Unpaid Salaries Issue) : मागील दोन महिन्यांचा (फेब्रुवारी व मार्च २०२६) थकीत पगार न मिळाल्याने कुरखेडा नगरपंचायतातील सर्व सफाई कर्मचारी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. नगरपंचायत कार्यालयासमोर सकाळपासून सफाई कामगार महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. “पगार द्या, काम घ्या”, “मेहनतीचे पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू”, “मुख्याधिकारी जागे व्हा” अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.

दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन देऊन ७ दिवसांत पगार जमा करण्याची मागणी केली होती. मात्र, आज १३ दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.

एक सफाई कर्मचारी म्हणाली,
“आम्ही रोज सकाळी ५ वाजेपासून रात्रंदिवस शहर स्वच्छ ठेवतो. पण आमच्या कुटुंबाची दोन वेळची रोटीही पोटात पडत नाही. दोन महिन्यांचा पगार अडकला आहे. आता आम्ही काम बंद ठेवणार आहोत. पैसे मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील.”

सफाई कामगार महिला बचत गटाच्या अध्यक्षा यांनी सांगितले की, “आम्ही वारंवार विनंती केली, तरीही दखल घेतली गेली नाही. आता लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या हक्कासाठी लढू. शासनाने तात्काळ पगार मंजूर करावा.”

सद्यस्थितीत नगरपंचायत क्षेत्रात स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. नगर पंचायत स्वच्छता सभापती सागर निरंकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लवकरच प्रशासन सोबत बैठकीचे आयोजन करून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र कर्मचारी यावर समाधानी नसून, पगार जमा होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संबंधित सामग्री

चारठाणा येथे मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, नाल्या तुंबल्या

चारठाणा येथे मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, नाल्या तुंबल्या

Charthana Dirty Road: चारठाणा गावात सफाई कर्मचारियों की हड़ताल के कारण मुख्य सड़कों पर कचरा और गंदगी का ढेर लग गया है, जिससे नागरिकों का जीवन कठिन हो गया है।

May 12, 2026